Crime News : प्रेमानंद महाराजांचे दर्शन करण्याचे आमिष दाखवून एका तरुणीला हॉटेलमध्ये नेले. त्यानंतर तिच्या प्येय पदार्थात औषध मिळले आणि तरुणी जागीच बेशुद्ध पडली. त्यानंतर तरुणीवर पाशवी अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील मथुरा येथे घडली आहे. महिलेला फसवून हे कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे. पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचं नाव सुंदरम राजपूत असे आहे.
ADVERTISEMENT
प्रेमानंद महाराजांचे दर्शन देतो असे सांगत हॉटेलमध्ये नेलं..
एका तरुणाने एका तरुणीला प्रेमानंद महाराजांचे दर्शन देतो असे सांगून आग्राहून मथुरा येथे आणले. त्यानंतर तिला एका हॉटेलमध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आले. तो तरुण एवढ्यावरच गप्प न बसता त्याने तरुणाचे फोटो आणि व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद करून ठेवले आहेत. आरोपीने धमकावले की, व्हिडिओ व्हायरल करण्याच्या बहाण्याने हा घृणास्पद गुन्हा करण्यात आला होता. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याच्याविरोधात पोलीस टाण्यात कायदेशीर कारवाई केली जात असल्याचं सांगण्यात येत आहे. संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला आता तुरुंगात पाठवले आहे.
काय होता इंस्टाग्राम मेसेज?
ऑगस्ट महिन्यात आरोपीकडून महिलेला इंस्टाग्रामवर एक मेसेज आला होता. त्यात प्रेमानंद महाराजांचं दर्शन देण्यात येईल असं नमूद केलं होतं. तरुणाचा हा मेसेज मिळाल्यानंतर, तरुणीला प्रेमानंद महाराजांना भेटण्यासाठी कसलसाही मोह न आवरल्याने ती मथुरा-वृंदावनला गेली. त्यानंतर तो तिला त्याच्या हॉटेलाच्या ऑफिसमध्ये घेऊन गेला. पीडितेनं आरोप केला की, त्याने प्येय पदार्थात मादक पदार्थ मिसळून पिण्यास दिले.
हे ही वाचा : पुणे : बिबट्या शेतात दबा धरून होता, मुलीला पाहताच बिपट्याने घेतली झडप, नंतर आजोबांच्या डोळ्यादेखतच थरार...
त्यानंतर तरुणी बेशुद्ध पडली आणि नंतर तिला शु्द्ध येताच तिला धक्का बसला. पीडितेनं असंही सांगितलं की, आरोपीने तिचा अश्लील व्हिडिओ देखील बनवला होता आणि तो व्हायरल करण्याची धमकी देत होता.
ADVERTISEMENT
