आईनेच केलं मुलाचं अपहरण, नवऱ्याकडे 21 लाखांची मागणी; पोलीस मावशीच्या घरी पोहोचताच...

Crime News : आईनेच केलं मुलाचं अपहरण, बापाकडे 21 लाखांची मागणी; पोलीस मावशीच्या घरी पोहोचताच...

Mumbai Tak

मुंबई तक

13 Oct 2025 (अपडेटेड: 13 Oct 2025, 01:08 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

आईनेच केलं मुलाचं अपहरण

point

नवऱ्याकडे 21 लाखांची मागणी

Crime News : पटनामधील ताराचक गावच्या अंजू देवीने माहेरची गरिबी दूर करण्यासाठी आपल्या मुलाचा अपहरण केल्याचं समोर आलंय. तिने मुलाला पटना सिटीतील मावशीच्या घरी पाठवून व्यावसायिक पतीकडे 21 लाख रुपये रक्कमेची खंडणी मागितली. मात्र, पोलीसांनी तिचा हा डाव मोडून काढलाय. घटनेची तक्रार केल्यानंतर सहा तासांच्या आतच मुलाला पटना सिटी परिसरातून सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे. या प्रकरणी दानापूर पोलिसांनी आई अंजू देवी, मावशी संजू देवी, मावशीचा पती पंकज कुमार, मामा रेविंस कुमार आणि त्यांच्या शेजारी अनिल कुमार यांना अटक केली आहे.

हे वाचलं का?

पोलिसांत तक्रार दाखल 

दानापूरच्या ताराचक गावातील सुनील मेहता यांचा तांदळाचा व्यवसाय आहे. त्यांचा 11 वर्षीय मुलगा पाचव्या वर्गात शिकतो. शनिवारी अचानक त्यांचा मुलगा गायब झाला. वडील त्याची शोधाशोध करत होते. याच दरम्यान एका अज्ञात नंबरवरून व्यावसायिकाचा फोन आला. फोनवर मुलाचा अपहरण झाल्याची माहिती देत 21 लाख रुपये रक्कमेची मागणी करण्यात आली. या घटनेने सुनील मेहताला हादरवून टाकले. नंतर त्यांनी मुलाच्या अपहरणाची आणि 21 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची तक्रार दानापूर पोलीस ठाण्यात नोंदवली. सिटी एसपी पश्चिमी भानुप्रताप सिंग यांनी सांगितले की, प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता एएसपीच्या नेतृत्वाखाली फौजदार प्रशांत भारद्वाज यांची टीम तयार करण्यात आली. पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासली, तर प्रकरण संशयास्पद आढळले.

हेही वाचा : पत्नी माहेरी जाताच पती हैवान बनला, पोटच्या 3 पोरांना मिठाई खाऊ घातली अन् गळा चिरला...

पोलीसांच्या मते, चौकशीदरम्यान मावशीने अपहरणाचे खोटे प्रकरण उघडकीस आणले. चौकशीत समोर आले की आई अंजू देवीने माहेरी लोकांसोबत मिळून पतीकडून पैसे उकळण्यासाठी मुलाचे अपहरण करण्याचं षडयंत्र रचले होते. खंडणीसंदर्भातील कॉल मावशी संजू देवीच्या मोबाइलमध्ये नवीन सिम टाकून मामा रेविंस कुमारच्या शेजारी अनिल कुमार याने केला होता. मामा रेविंस कुमार मुलांना ट्युशन शिकवतात. अंजू देवीला विश्वास होता की मुलाच्या अपहरणाची गोष्ट ऐकून व्यावसायिक पती पैसे देईल. नंतर मिळालेली रक्कम माहेरच्या लोकांना आर्थिक सहाय्य म्हणून वाटून दिली जाईल.

पोलीस तपासात सहकार्य न केल्याने महिला संशयाच्या भोवऱ्यात आल्या

अंजू देवी तपासात पोलीसांची मदत करत नव्हती, ज्यामुळे पोलिसांना संशय आला. तपासात कॉल करणाऱ्याचं लोकशन पटना सिटीमध्ये आढळले. त्यानंतर पोलिसांनी छापा मारून आलमगंज येथील मावशी संजू देवीच्या घरातून मुलाला सुरक्षितपणे बाहेर काढले.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मला पाडण्यासाठी भाजपने 5 कोटी दिले, स्थानिक निवडणुकीत तुकडा सुद्धा देणार नाही, अजितदादांच्या आमदाराचं वक्तव्य

    follow whatsapp