पत्नी माहेरी जाताच पती हैवान बनला, पोटच्या 3 पोरांना मिठाई खाऊ घातली अन् गळा चिरला...
Crime News : पत्नी माहेरी जाताच पती हैवान बनला, पोटच्या 3 पोरांना मिठाई खाऊ घातली अन् गळा चिरला
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पत्नी माहेरी जाताच पती हैवान बनला

पोटच्या 3 पोरांना मिठाई खाऊ घातली अन् गळा चिरला
Crime News : तामिळनाडूमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. बापाने आपल्या तीन निष्पाप मुलांचा गळा चिरून खून केला आणि त्यानंतर स्वतः पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. ही घटना पत्तुकोट्टईजवळील पेरियाकोट्टई गावातील आहे. आरोपी विनोथ कुमार याने पत्नी वेगळी राहू लागल्यामुळे रागाच्या भरात हे पाऊल उचलले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
पहिले मुलांना मिठाई दिली, मग केला खून
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी विनोथ कुमार याचं लग्न नित्याशी झालं होतं. त्यांना तीन मुलं होती — 11 वर्षांची ओविया, 8 वर्षांची कीर्ती आणि 5 वर्षांचा ईश्वर. गेल्या सहा महिन्यांपासून दाम्पत्यामध्ये वाद सुरू होता आणि ते वेगवेगळं राहत होते. नित्या आपल्या माहेरी राहत होती, तर मुलं वडिलांसोबत मधुकुर गावात राहत होती.
काही दिवसांपूर्वी विनोथनं नित्याशी पुन्हा एकत्र राहण्याचा प्रयत्न केला, पण तिनं नकार दिला. त्यामुळे विनोथ खूप खचला. शुक्रवारी त्यानं आपल्या मुलांसाठी मिठाई आणली, त्यांना ती दिली आणि त्यानंतर तिन्ही मुलांचा गळा चिरून खून केला.
हेही वाचा : मुंडकं नसलेल्या मृतदेहासोबत 3 महिने राहिली एकाच घरात... 'असा' बनवला प्लॅन! पोलीसही म्हणाले काय हा प्रकार?