'पप्पांना मारु नको...', पती दारु पिऊन घरी आला, संतापलेल्या पत्नीचं क्रूर कृत्य, चिमुकला ओरडला पण..
Crime News : 'पप्पांना मारु नको...', पती दारु पिऊन घरी आला, संतापलेली पत्नीचं क्रूर कृत्य, चिमुकला ओरडला पण..
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पती दारु पिऊन घरी आला, संतापलेल्या पत्नीने केली हत्या

पप्पांना मारु नको, मुलगा ओरडत राहिला
Crime News : हैद्राबादमधील केशमपेट भागातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका महिलेनं आपल्या मद्यपी नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून त्याची निर्घृणपणे हत्या केली. हत्या होत असताना त्यांचा मुलगाही त्या ठिकाणी उपस्थित होता. तो वारंवार आईला विनंती करत होता की, "आई, बाबाांना मारू नकोस", मात्र आईनं त्याचं काही ऐकलं नाही. पोलिसांनी माहिती मिळताच हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी पत्नीच्या शोधाला सुरुवात केली आहे.
दारू बनली कौटुंबिक कलह आणि मृत्यूचं कारण
मीडिया रिपोर्टनुसार, ती महिला आपल्या नवऱ्याच्या दारूच्या व्यसनामुळे खूप त्रस्त होती. नवरा नेहमी दारू पिऊन घरी येत असे आणि तिला त्रास देत असे. पोलिसांच्या माहितीनुसार, 35 वर्षीय कोप्पू कुमार या व्यक्तीचा शनिवारी त्याची पत्नी के. माधवी हिने विटेने डोक्यावर वार करून खून केला.
हेही वाचा : मुंडकं नसलेल्या मृतदेहासोबत 3 महिने राहिली एकाच घरात... 'असा' बनवला प्लॅन! पोलीसही म्हणाले काय हा प्रकार?
12 वर्षांच्या मुलासमोर वडिलांची हत्या
नवरा-बायकोमध्ये सतत वाद होत असत. कोप्पू कुमार हा मजुरीचं काम करत असे आणि नेहमी दारू पिऊन घरी येत असे. शनिवारी रात्रीही तो दारूच्या नशेत घरी आला. त्याला अशा अवस्थेत पाहून माधवीचा संताप अनावर झाला. तिनं जवळच पडलेली वीट उचलून कुमारच्या डोक्यावर अनेक वार केले. त्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला. त्या वेळी दोघांचा 12 वर्षांचा मुलगाही उपस्थित होता आणि तो आईला वारंवार म्हणत होता, “आई, बाबाांना सोड”, पण माधवीनं त्याचं काही ऐकलं नाही.