तरुण महिलांची अंतर्वस्त्रे चोरून परिधान करायचा, छुप्या कॅमेऱ्यात सगळंच रेकॉर्ड

मुंबई तक

16 Jul 2026 (अपडेटेड: 16 Jul 2026, 03:13 PM)

Crime News : एक तरुण बाहेर वाळवत टाकलेल्या महिलांचे अंतर्वस्त्रे चोरून रात्रभर घालून दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी ठेवायचा. दुसऱ्या दिवशी इतर महिलांची अंतर्वस्त्रे चोरली जायची. या चोरीला कंटाळून दोन तरुणींना कपडे वाळवण्याच्या जागेतच एक छुपा कॅमेरा लावला होता.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

तरुणाने वाळवत घातलेली महिलांची अंतर्वस्त्रे चोरल्याचा आरोप

point

दोघींनी घटनास्थळी छुपा कॅमेरा लावला 

Crime News : कर्नाटकमधील बंगळुरूमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एक तरुण बाहेर वाळवत टाकलेल्या महिलांचे अंतर्वस्त्रे चोरून रात्रभर घालून दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी ठेवायचा. दुसऱ्या दिवशी इतर महिलांची अंतर्वस्त्रे चोरली जायची. या चोरीला कंटाळून दोन तरुणींना कपडे वाळवण्याच्या जागेतच एक छुपा कॅमेरा लावला होता. ज्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथेच...', आदिनाथ-उर्मिलाचा घटस्फोट, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

तरुणाने वाळवत घातलेली महिलांची अंतर्वस्त्रे चोरल्याचा आरोप

ही घटना बंगळुरूतील इंदिरानगर पोलीस ठाणे परिसरातील आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपीची अब्दुल हुसैन (वय 23) अशी ओळख समोर आली. त्याच्यावर रात्री छतावर वाळवत घातलेली महिलांची अंतर्वस्त्रे चोरल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या तपासानुसार, आरोपीचे विचित्र वर्तन उघडकीस आले आहे. 

तो रात्रीच्या वेळी महिलांचे अंतर्वस्त्रे चोरून परिधान करायचा. दुसऱ्याच दिवशी तो चोरलेले अंतर्वस्त्रे त्याच ठिकाणी परत आणून ठेवायचा, नंतर दुसरी अंतर्वस्त्रे चोरी करायचा. त्याच्या वारंवार होणाऱ्या वर्तनामुळे अनेकदा महिला त्रस्त झालेल्या होत्या.  होयसाला नगरमध्ये राहणाऱ्या दोन तरुणींच्या लक्षात आलं की, काही दिवसांपासून नवीन अंतर्वस्त्रे रात्री गायब होतात. 

दोघींनी घटनास्थळी छुपा कॅमेरा लावला 

या विचित्र प्रकारामुळे त्या अगदी गोंधळून जात होत्या. जेव्हा त्या तरुणींना लक्षात आल्यानंतर हा प्रकार कोणीतरी जाणुनबुजून करत असल्याचा संशय बाळावाला. दोन महिलांनी मिळून एक छुपा कॅमेरा लावला. 2 जुलै रोजीच्या मध्यरात्री 3 वाजता आरोपीचे संपूर्ण कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले. संबंधित फुटेजमध्ये आरोपी अंतर्वस्त्र परिधान करताना दिसत आहे. 

हे ही वाचा : अंबरनाथ लोकलमध्ये सीटचा वाद, लोखंडी कड्याने हल्ला; घटनेचा रक्तरंजित थरार

रेकॉर्ड करण्यात आलेल्या व्हिडिओच्या आधारे इंदिरानगर पोलिसांनी आरोपीला अटक केली. सुरूवातीला आरोपीच्या ओळखीबाबत वेगवेगळी माहिती समोर आली होती. परंतु पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीची अब्दुल हुसैन अशी ओळख पटली आहे. संबंधित प्रकरणात आरोपीने इतर काही ठिकाणी असेच कृत्य केल्याची माहिती समोर आली.