प्रेयसीच्या नादी लागला, सोन्यासारख्या पत्नीला पावडर खाऊ घातली; भयंकर प्रकरण!

Crime News : पतीने आपल्या प्रेयसीच्या मदतीने 22 वर्षीय पत्नीची निर्घृण हत्या केली आणि मृतदेह झुडपात फेकून दिला. नेमकं प्रकरण काय? समजून घेऊयात..

Crime News

Crime News

मुंबई तक

• 07:11 AM • 31 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

प्रेयसीच्या नादी लागला,

point

सोन्यासारख्या पत्नीला पावडर खाऊ घातली; भयंकर प्रकरण!

Crime News : एका नराधम पतीने आपल्या प्रेयसीच्या संगनमताने स्वतःच्या पत्नीची अत्यंत क्रूरपणे हत्या केली आहे. 24 मे रोजी एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती, तिची ओळख रेवती नगरातील प्रीती देवी (२२) अशी पटली. या प्रकरणी पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि अखेर शुक्रवारी पतीसह त्याच्या प्रेयसीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, आरोपींच्या निर्दयी कृत्याबद्दल सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : बहिणीसोबत मुलाचे प्रेमसंबंध, भावासह साथीदारांनी संपवलं; मृतदेह गटारात...

पतीस प्रेयसीला ठोकल्या बेड्या

मृतक तरुणीचे वडील श्याम देव यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीतीचा विवाह 6 मार्च 2025 रोजी चुन्नीलाल प्रजापती याच्याशी झाला होता. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच हुंड्यासाठी प्रीतीचा सासरच्या मंडळींकडून छळ सुरू झाला आणि तिला मारहाण केली जाऊ लागली. 22 मे रोजी प्रीती अचानक बेपत्ता झाल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. श्याम देव यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सुरुवातीला 8 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणाचा सखोल तपास करत असतानाच पोलिसांना धक्कादायक धागेदोरे हाती लागले आणि पती चुन्नीलाल प्रजापती (25) व त्याची प्रेयसी शोभा चौरसिया (21) यांच्यावर संशय बळावला.

हेही वाचा : नागपूर : इयत्ता 9 वी असताना ओळख झाली, नराधमाने 3 वर्षात केलं भयंकर कांड

मृतदेह झुडपात फेकून दिला

चौकशीदरम्यान प्रेयसी शोभाने केलेल्या खुलासामुळे या हत्याकांडाचा भीषण कट समोर आला आहे. चुन्नीलालच्या सांगण्यावरून 22 मे रोजी सकाळी 9 वाजता शोभाने प्रीतीला फिरायला जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर बोलावले. चुन्नीलालने शोभाला एक संशयास्पद पावडरचे पाकीट दिले होते, जे तिने प्रीतीला पाण्यासोबत पाजले. यामुळे प्रीती काही वेळातच शुद्ध हरपली. त्यानंतर ई-रिक्शाने तिला बायासी पुलाकडे नेले, जिथे आधीच तयारीत असलेल्या चुन्नीलालने तिला बाईकवर मधोमध बसवले. त्यानंतर पुलाच्या पलीकडे एका निर्जन ठिकाणी नेऊन त्यांनी प्रीतीचा गळा आवळून तिची निर्घृण हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह झुडपात फेकून दिला.

या अमानुष हत्येनंतर आरोपींनी मृतदेह झुडपात लपवून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांच्या चौकशीत त्यांचे बिंग फुटले. पतीने आपल्या प्रेयसीच्या मदतीने केलेल्या या कटकारस्थानामुळे प्रीतीचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले आहे. पोलिसांनी आता चुन्नीलाल प्रजापती आणि शोभा चौरसिया या दोघांनाही अटक केली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. हुंड्यासाठी स्वतःच्या पत्नीचा बळी घेणाऱ्या या नराधम पतीच्या आणि त्याच्या प्रेयसीच्या या कृत्यामुळे बलिया परिसरातील नागरिक संतापले असून, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करत आहेत. पोलीस आता या प्रकरणाशी संबंधित इतर संशयितांचाही कसून तपास करत आहेत. ही घटना उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यातून समोर आली आहे.