crime news : बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील राजगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजगीर ठाण्याच्या हद्दीत कार्यरत असलेले एएसआय सुमन तिर्की यांनी मंगळवारी (दि.14) सकाळी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. दरम्यान, पोलीस अधिकाऱ्याच्या आत्महत्येमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत.
ADVERTISEMENT
कौटुंबिक वादामुळे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज
सुमन तिर्की झारखंडच्या गुमला जिल्ह्याच्या धाबरा परिसरातील भटौली गावाचे रहिवासी होते. ते गेल्या वर्षभरापासून राजगीरमध्ये डायल 112 आपत्कालीन सेवेत कार्यरत होते. डीएसपी सुनील कुमार यांच्या माहितीनुसार, ही घटना कौटुंबिक वादामुळे घडल्याचे प्राथमिक तपासातून दिसून येत आहे. मात्र अद्याप पूर्ण तपास संपलेला नाही.
हेही वाचा : दुसऱ्या मुलाला बोलत असल्याचा राग, संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या डोक्यात घातला हातोडा, रायगडमधील घटना
फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा केले, अधिक तपास सुरु
पोलिसांनी घटनास्थळाची सखोल पाहणी केली असून, सुमन तिर्कींच्या कुटुंबीयांशी संवाद साधण्यात आला आहे. पोस्टमार्टम नंतरच आत्महत्येच्या नेमक्या कारणांचा उलगडा होऊ शकतो. राजगीर परिसरातील पोलिस आणि प्रशासन घटना तपासण्यात पूर्णपणे गुंतले आहेत, तसेच स्थानिक नागरिकांमध्ये देखील या घटनेमुळे धक्का बसला आहे. आत्महत्या करणाऱ्यासाठी एएसआयने वापरलेल्या बंदुकीची परिस्थिती आणि ते कुठल्या परिस्थितीत वापरली गेली, याचा सखोल तपास फॉरेंसिक तज्ज्ञ करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणात लागलेले सर्व पुरावे देखील गोळा केले आहेत. या घटनेमुळे राजगीर परिसरात शोककळा पसरली असून, सुमन तिर्कींच्या सहकाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी त्यांच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केले आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून संवाद महत्त्वाचं असल्याचं बोललं जात आहे.
काही दिवसांपूर्वीच आयपीएस अधिकऱ्याने संपवलं होतं आयुष्य
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच हरियाणातील आयपीएस वाय. पूरन कुमार यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. 2001 च्या बॅचचे हे आयपीएस अधिकारी वाय. पूरन कुमार कधीच सत्तेसमोर झुकले नाहीत. ते भ्रष्टाचार, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गैरव्यवहारांविरोधात नेहमीच आवाज उठवताना पाहायला मिळायचे. मात्र, 7 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांनी चंदीगडमधील त्यांच्या सरकारी निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. शिवाय, या आत्महत्यामागे जातीवादाचं कारण असल्याचंही समोर आलं होतं.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
