पुण्यात भंगार चोरण्यासाठी आलेल्या चोरांना नागरिकांकडून बेदम मारहाण, एका चोराचा मृत्यू

Pune Crime News : पुण्यात भंगार चोरण्यासाठी आलेल्या चोरांना नागरिकांकडून बेदम मारहाण, एका चोराचा मृत्यू

Mumbai Tak

मुंबई तक

14 Oct 2025 (अपडेटेड: 14 Oct 2025, 08:44 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यात भंगार चोरण्यासाठी आलेल्या चोरांना नागरिकांकडून बेदम मारहाण

point

मारहाण झालेल्या एका चोराचा मृत्यू

Pune Crime :पुण्यातील चंदननगर परिसरात चोरीसाठी आलेल्या तीन चोरांना नागरिकांनी पकडून बेदम मारहाण केली. मात्र, यावेळी एक धक्कादायक घटना घडलीये. या मारहाणीत एका चोराचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी आहेत. नवाज इम्तियाज खान (वय 26, रा. भवानी पेठ, मूळ बेंगळुरू) असं मारहाणीत मृत्यू झालेल्या चोराचं नाव आहे. जखमींची नावे हमीद अबजल मोहम्मद (वय 20) आणि हमीद अबजल अहमद (वय 19) अशी आहेत. दोघांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे वाचलं का?

हेही वाचा : Maharashtra Board Class 10, 12 Exam: मुलांनो तयारीला लागा... HSC आणि SSC परीक्षा 'या' तारखेपासून होणार सुरू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री चंदननगर येथील पंचनगर परिसरात असलेल्या एका भंगार दुकानात तिघे चोर चोरीसाठी शिरले. दोन चोर दुकानात घुसून लोखंडी साहित्य चोरत होते, तर एक बाहेर पहारा देत होता. चोरीदरम्यान झालेल्या आवाजामुळे परिसरातील नागरिक जागे झाले. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत चोरांना पकडले आणि बेदम मारहाण केली.

हेही वाचा : नागपूर: जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर, पाहा तुमच्या मतदारसंघात कोण राहू शकतं उभं!

काही चोर पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना लोकांनी त्यांना जवळच्या गोडाऊनमध्ये ओढून पुन्हा मारहाण केली. या हल्ल्यात नवाज खानचा मृत्यू झाला, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. सकाळी दुकानाचा मालक कामावर आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्याने लगेच पोलिसांना कळवले. चंदननगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक सीमा ढाकणे यांनी घटनास्थळी पथक पाठवून पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, मारहाण करणाऱ्या नागरिकांविरोधातही पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना कायदा हातात न घेता अशा घटनांची तत्काळ माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देण्याचे आवाहन केले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

भाजप आमदाराने केलेला गोळीबार, भाजपसाठी शिदेंनी हाकललं.. तेच महेश गायकवाड आता हाती घेणार कमळ?

    follow whatsapp