मुलगी कपडे काढताना व्हिडिओ शूट केला, नंतर ब्लॅकमेल करत..., प्रसिद्ध युट्यूबरसह त्याच्या मुलाचे हैवानी कृत्य

crime news : एका लोकप्रिय युट्यूबरने आणि त्याच्या मुलाने मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक केली, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे, नेमकं प्रकरण काय आहे समजून घेऊयात.

crime news

crime news

मुंबई तक

13 Oct 2025 (अपडेटेड: 13 Oct 2025, 07:07 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

लोकप्रिय युट्यूबरसह त्याच्या मुलाने मुलीसह केलं नको तेच

point

पोलिसांनी 'त्या' आरोपाखाली केली अटक

point

नेमकं काय घडलं?

crime news : पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यात एका लोकप्रिय युट्यूबरने आणि त्याच्या मुलाने मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक केली, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. लाखोंचे फॉलोअर्स असलेले युट्यूबर्स अरबिंदा मंडल यांनी रविवारी त्यांच्या लहान मुलासह 15 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. संबंधित मुलगी ही त्याला रील बनवण्यास मदत करत होती. या प्रकरणात मुलीने आरोप केला की, ती कपडे बदलत असताना दोघांनीही व्हिडिओ बनवला आणि नंतर मला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. याचमुळे आता आरोपींवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : सोलापूरात पोलीस अंमलदाराचा झोपेत खाटेवरून पडून मृत्यू, कुटुंब पडलं वाऱ्यावर, पंचनाम्यातून काय उलगडलं?

मुलगी कपडे काढताना व्हिडिओ शूट केला आणि...

बशीरहाटतचे पोलीस अधीक्षक हुसैन मेहदी रहमान म्हणाले की, मंडलला बशीरहाट येथील एसडीजेएम न्यायालायात नेण्यात आले. नंतर तीन दिवसांची पोलस कोठडी सुनावण्यात आली. नंतर त्या मुलाला बालसुधागृहात पाठवण्यात आले आहे. दोघांनीही मुलगी कपडे काढताना व्हिडिओ शूट केला आणि नंतर तिला ब्लँकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला. 

मुलीने तिच्यासोबत घडलेल्या सर्व प्रकाराची आणि छळाची माहिती कुटुंबियांना दिल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. त्यानंतर कुटुंबियांनी लैंगिक अत्याचाराबाबतची माहिती समजली. संबंधित प्रकरणात अधिकाऱ्याने सांगितलं की, मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे, परंतु अधिक माहिती देण्यात आली नाही. 

हे ही वाचा : सातारा हादरला! घरात कोणीच नसताना मुलगी कपडे बदलत होती, घरात नराधम शिरला अन् मुलीच्या डोक्यात घातलं दगडी जातं

मुलीच्या कुटुंबियांनी सांगितलं की, वडील मुलाने काही महिन्यांपूर्वी नववीच्या विद्यार्थिनीकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिला एक शॉर्ट फिल्म बनवण्याबाबत मदत करण्यास सांगितली होती आणि त्यानंतर मुलगी याच कामानिमित्त अनेक ठिकाणी गेली होती. 

    follow whatsapp