एकतर्फी प्रेम, सनकी प्रियकराकडून विद्यार्थीनीचं अपहरण, पण सात दिवसांनंतर मोठा गेम

Crime News : एकर्फी प्रेम, सनकी प्रियकराकडून विद्यार्थीनीचं अपहरण, पण सात दिवसांनंतर मोठा गेम

Mumbai Tak

मुंबई तक

14 Oct 2025 (अपडेटेड: 14 Oct 2025, 10:24 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

एकर्फी प्रेम, सनकी प्रियकराकडून विद्यार्थीनीचं अपहरण

point

सात दिवसांनंतर मोठा गेम, पोलिसांनी घेतल ताब्यात

Crime News : बिहारमधील पटना येथे पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचं अपहरण झालं होतं. पोलिसांनी तिला सुखरूप शोधून काढलं असून आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. त्याच्या कारमधून एक पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. आरोपीविरुद्ध पुढील कारवाई सुरू आहे. ही घटना बेऊर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

हे वाचलं का?

अपहरण प्रकरणात पोलिसांनी विद्यार्थिनीचं अपहरण करणारा युवक मुकुंद कुमार उर्फ मुकेश कुमार (रा .विशुनपूर पकडी, बेऊर) याला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी मुकेशला पीडित विद्यार्थिनीविषयी एकतर्फी प्रेम होतं आणि तो तिच्याशी लग्न करू इच्छित होता. या कारणाने त्याने सुमारे सात दिवसांपूर्वी तिचं अपहरण केलं. एवढंच नव्हे तर लग्नाच्या तयारीही त्याने पूर्ण केली होती. मात्र, लग्न होण्याआधीच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 ऑक्टोबरच्या संध्याकाळी 15 वर्षांची पॉलिटेक्निक कॉलेजची विद्यार्थिनी घरातून काही सामान आणण्यासाठी बाहेर गेली होती. त्याच वेळी मुकेश कुमारने कारमधून तिचं अपहरण केलं. नंतर त्याने पीडितेला हाजीपूरसह इतर ठिकाणी नेलं. आरोप आहे की, आरोपीने विद्यार्थिनीला मानसिक आणि शारीरिक छळ केला तसेच तिचे व्हिडिओही तयार केले.

मुलीच्या कुटुंबियांना धमक्या

मुकुंद कुमार विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना धमकीचे संदेश पाठवत होता. त्याने व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. "जे सांगितलं जाईल ते करा, नाहीतर व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करेन," असा इशारा त्याने दिला होता. त्यामुळे पीडितेच्या आईने बेऊर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस आरोपीचा शोध घेत होते. दरम्यान, पोलिसांच्या माहितीनुसार, बेऊर पोलिसांनी गर्दनीबाग येथील बी.डी. कॉलेजजवळ शनिवारी आरोपीला कारमधून जात असताना पकडलं. त्यावेळी कारमध्ये ती विद्यार्थिनीही होती.

पोलिसांनी गाडीची झडती घेतल्यानंतर गाडीतून शस्त्रं मिळाली. आरोपीच्या मोबाईलमध्ये विद्यार्थिनीचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ देखील आढळले. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी मुकेश यापूर्वी दारू तस्करीच्या प्रकरणात तुरुंगात गेला होता. पटना पश्चिम विभागाचे पोलिस अधीक्षक यांनी सांगितलं की, आरोपीकडून कार, एक पिस्तूल, तीन काडतुसे आणि मोबाईल जप्त करून पुढील कारवाई सुरू आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Maharashtra Board Class 10, 12 Exam: मुलांनो तयारीला लागा... HSC आणि SSC परीक्षा 'या' तारखेपासून होणार सुरू

 

    follow whatsapp