Crime News : उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन मुलांची आई असलेल्या ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेवर 16 वर्षीय मुलाला पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार प्रेमसंबंधाशी संबंधित असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, त्या महिलेच्या शेजारी 16 वर्षीय मुलगा राहत होता. दोघांची ओळख इन्स्टाग्रामवर झाली. त्यानंतर त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर एक्सचेंज केले आणि हळूहळू त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. रोज ते दोघे भेटू लागले. किशोराच्या आई-वडिलांना सुरुवातीला काहीच संशय आला नाही, कारण त्या महिलेशी त्यांच्या मुलाचं वय खूपच वेगळं होतं.
दरम्यान, ती महिला आपल्या मावशीकडे गीडा परिसरात राहायला गेली आणि तिने त्या 16 वर्षीय मुलालाही तिकडे बोलावायला सुरुवात केली. त्यावेळी किशोराच्या आई-वडिलांना या नात्याबद्दल कळलं. त्यांनी मुलाला समजावलं – “बाळा, हे चुकीचं आहे, असं करू नकोस.” पण काही दिवसांनंतर तो मुलगा अचानक घरातून गायब झाला.
मुलगा बेपत्ता झाल्यानंतर पालकांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्याच वेळी ती ब्युटी पार्लर चालवणारी महिला देखील गायब होती. तिच्या आईनंही मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत केली. तपासात समोर आलं की त्या महिलेशी किशोराचं सतत बोलणं होतं. पोलिसांनी जेव्हा चौकशीसाठी किशोराच्या घरी भेट दिली, तेव्हा संपूर्ण प्रकरण स्पष्ट झालं.
मुलाच्या आई-वडिलांनी त्या महिलेविरुद्ध आरोप केला की, तिनं त्यांच्या मुलाला पळवून नेलं आहे. सध्या त्या महिलेला दोन मुले असून ती दोघंही आपल्या आजीकडे आहेत आणि आईसाठी रडत आहेत. या प्रकरणाची तिवारीपूर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी सांगितलं की, किशोराच्या पालकांनी त्या महिला आणि तिच्या मावशीवर अपहरणाचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, महिलेनं प्रेमाच्या बहाण्याने मुलाला फसवून नेलं. आम्ही मुलाला समजावलं होतं, पण तो ऐकला नाही आणि तिच्याशी संपर्कात राहिला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून दोघांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
