75 लाख रुपयांच्या इन्शुरन्ससाठी रचला मोठा कट! आधी पत्नीला संपवलं अन् पोलिसांना दिशाभूल करण्याचा भलताच प्लॅन...

एका तरुणाने पैशांच्या हव्यासापोटी आपल्या पत्नीलाच संपवून टाकल्याचं वृत्त समोर आलं आहे. आरोपी पतीने आधी पत्नीची निर्घृण हत्या केली आणि नंतर, तिचा मृत्यू अपघातामुळे झाल्याचं दाखवून पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

75 लाख रुपयांच्या इन्शुरन्ससाठी रचला भयानक कट!

75 लाख रुपयांच्या इन्शुरन्ससाठी रचला भयानक कट!

मुंबई तक

• 10:28 AM • 14 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

75 लाख रुपयांच्या इन्शुरन्ससाठी मोठा कट!

point

पोलिसांना दिशाभूल करण्याचा भलताच प्लॅन...

Crime News: झारखंडच्या हजारीबादमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. येथे एका तरुणाने पैशांच्या हव्यासापोटी आपल्या पत्नीलाच संपवून टाकल्याचं वृत्त समोर आलं आहे. आरोपी पतीने आधी पत्नीची निर्घृण हत्या केली आणि नंतर, तिचा मृत्यू अपघातामुळे झाल्याचं दाखवून पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या तपासातून सत्य घटना उघडकीस आली. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या. 

हे वाचलं का?

इन्शुरन्सच्या पैशांसाठी रचला मोठा कट

संबंधित घटना ही पद्मा प्रखंड येथील लाटी गावात घडल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी येथे राहणाऱ्या एका महिलेचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या अपघातात तिचा पती देखील जखमी झाला होता. मात्र, पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला आणि पतीनेच आपल्या पत्नीची हत्या केल्याचं उघडकीस आलं. आरोपी पतीने आपल्या पत्नीच्या हत्येला अपघात दाखवण्याचा प्रयत्न केला. खरी घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आणि त्याला कोर्टात सादर केलं. तिथून त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. 

हे ही वाचा: बिग बी अमिताभ बच्चन यांच्याशी बेदरकारपणे वागणारा इशित नेमका आहे तरी कुठला?

रस्त्याच्या कडेला आढळला मृतदेह 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेश कुमार मेहता याने इन्शुरन्सच्या 75 लाख रुपयांच्या लोभापायी आपल्या पत्नीची हत्या केली आणि नंतर, पीडितेचा मृत्यू अपघातामुळे झाल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. 9 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास परिसरातील एका रस्त्याच्या कडेला पीडितेचा मृतदेह आढळला. मृतदेहाच्या बाजूलाच पीडितेचा पती सुद्धा बेशुद्ध अवस्थेत आढळला. पोलिसांच्या प्राथमिक तपासातून, ही घटना रस्ते अपघात असल्याचं सांगण्यात आलं. मात्र, प्रकरणाचा पुढील तपास केला असता धक्कादायक बाब समोर आली. 

हे ही वाचा: दोन मुलांची आई पण 16 वर्षांच्या मुलावर जीव जडला, दोघेही पळून गेले अन् कुटुंबियांसमोर मोठा पेच

आरोपीने केला गुन्हा कबूल 

पीडित पत्नीच्या नावावर 75 लाख रुपयांचा विमा होता. याच विम्याच्या पैशांसाठी आरोपीने आपल्या पत्नीची हत्या केली. पोलिसांच्या तपासादरम्यान, कठोर चौकशीनंतर आरोपीने त्याचा गुन्हा कबूल केला. चौकशीदरम्यान आरोपीने सांगितलं की, रस्त्याने जात असताना त्याने त्याच्या पत्नीचं नाक आणि तोंड दाबलं आणि यात पीडितेचा मृत्यू झाला. त्यानंतर, आरोपीने आपल्या पत्नीला रस्त्याच्या कडेला झोपवलं आणि ही घटना अपघात असल्याचं भासवण्यासाठी तो पत्नीच्या शेजारी रस्त्यावर पडून राहिला.  

    follow whatsapp