Crime News : उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बिनौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जीवना गालियान या गावात एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. प्रेम, विश्वासघात, धमकी आणि अखेरीस खून या सगळ्यांचं मिश्रण असलेल्या घटना घडल्याने संपूर्ण जिल्हा हादरलाय. नेमकं प्रकरण काय जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT
सुमारे पंधरा वर्षांपूर्वी मुजफ्फरनगर येथील सरोज नावाच्या महिलेने आपल्या मुली सोनियाचं लग्न सोनू सैनी या तरुणाशी केलं होतं. लग्नानंतर सरोजही मुलगी आणि जावयासोबत राहू लागली. सुरुवातीला सर्व काही सुरळीत होतं; परंतु काही काळानंतर सासू आणि जावई यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले.
पोलीस तपासात हे समोर आलं की सोनू आणि सरोज यांनी एकत्र काही अशोभनीय व्हिडीओ क्लीपही तयार केल्या होत्या. त्या काळात सोनूने सरोजच्या नावावर बिजनौर येथे एक जमिनीचा तुकडा घेतला होता. त्या जमिनीची सध्याची किंमत सुमारे वीस लाख रुपये आहे. मात्र, सोनू ती जमीन विकण्याचा प्रयत्न करत होता, पण सरोज आणि तिची मुलगी या दोघींनाही यास विरोध होता.
हेही वाचा : सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'ओंकार' हत्तीचा धुमाकूळ, दुचाकी पाय ठेवून चिरडून टाकली; व्हिडीओ व्हायरल
या वादानंतर सोनूने सरोजला तिच्याच व्हिडीओच्या आधारे धमकावणे आणि ब्लॅकमेल करणे सुरू केले. “माझं ऐकलं नाही तर तुझे व्हिडीओ व्हायरल करीन,” अशी धमकी त्याने दिली होती. यानंतर आई-मुलीने मिळून त्याच्यावर सूड उगवायचा कट रचला.11 ऑक्टोबर 2025 च्या रात्री, दोघींनी मिळून सोनूचा निश्चित केलेल्या योजनेनुसार खून केला. त्यांनी त्याला दूधात झोपेच्या गोळ्या मिसळून प्यायला दिलं. झोप लागल्यानंतर दोरीने गळा आवळून त्याचा जीव घेतला. नंतर त्याचा मृतदेह खोलीत लटकवून ठेवण्यात आला, जेणेकरून सर्वांना तो आत्महत्या वाटावी.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी गावात बातमी पसरली की सोनूने आत्महत्या केली आहे. घाईघाईत त्याचे अंत्यविधी पार पडले. मात्र, काही तासांतच सोनूचा भाऊ मोनू सैनी याला संशय आला. त्याने पोलिसांकडे धाव घेतली. चौकशीत पत्नी सोनियाने भावनिक अवस्थेत सांगितले की, तिच्या पतीला रात्री काही जण बोलावून घेऊन गेले होते. या माहितीच्या आधारे पोलीस तपास सुरू झाला आणि संपूर्ण कट उघडकीस आला.
सरोज आणि सोनियाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर दोघींनीही गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी मान्य केलं की, अनैतिक संबंध आणि जमिनीच्या वादातून त्यांनी सोनूची हत्या केली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रवीणसिंह चौहान यांनी सांगितलं की, हा प्रकार आत्महत्येचा भास निर्माण करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होता. मात्र, पोलिसांच्या सखोल तपासामुळे सत्य बाहेर आलं. दोघींनाही अटक करण्यात आली असून, पुढील चौकशी सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
