श्राद्धाचं जेवण जेवण्यास नकार दिला, संतापलेल्या भावाने भावाच्या डोळ्यावर अ‍ॅसिड फेकलं

Crime News : श्राद्धाचं जेवण जेवण्यास नकार दिला, संतापलेल्या भावाने भावाच्या डोळ्यावर अ‍ॅसिड फेकलं

Mumbai Tak

मुंबई तक

20 Oct 2025 (अपडेटेड: 20 Oct 2025, 01:14 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

श्राद्धाचं जेवण जेवण्यास नकार दिला

point

संतापलेल्या भावाने भावाच्या डोळ्यावर अ‍ॅसिड फेकलं

Crime News : मुजफ्फरपूर (बिहार) जिल्ह्यातील गोरौल पोलीस ठाण्याच्या सीमेत येणाऱ्या सोंधो कहारटोली गावात श्राद्धाचे जेवण जेवण्यास नकार दिल्याने मोठ्या भावाने लहान भावावर अॅसिड हल्ला केल्याची संतापजनक घटना शनिवारी घडली. या हल्ल्यात आनंद प्रकाश (वय 28) गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने स्थानिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्याच्या डोळ्यांवर आणि मानेवर गंभीर भाजल्या असून प्रकृती चिंताजनक आहे.

हे वाचलं का?

स्थानिक सरपंच रमेशचंद्र गुप्ता यांनी सांगितले की, आनंद प्रकाश पाच भावांपैकी एक आहे. शुक्रवारी त्याच्या चुलतीचे श्राद्धकर्म पार पडले होते. मात्र आनंदने त्या जेवणास जाण्यास नकार दिला. या कारणावरून मोठा भाऊ सुरेश कुमार संतापला आणि रागाच्या भरात त्याने आनंदवर अॅसिड फेक केली.

हेही वाचा : जालन्यात रक्ताच्या थारोळ्यात आढळला तीन वर्षीय मुलीचा मृतदेह, भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्याचा अंदाज

जखमी आनंदची पत्नी अनीता हिने सांगितले की, तिच्या पतीचा आणि देवर सुरेश यांचा जमिनीचा वाद बऱ्याच काळापासून सुरू आहे. शुक्रवारी पती श्राद्धाच्या जेवणाला गेला नाही, यावरून सुरेश, त्याची पत्नी सुलेखा आणि मुलगा विवेक तिघे त्यांच्या घरासमोर आले. त्यानंतर वाद वाढला आणि आधी मारहाण करून नंतर सुरेशने अॅसिडची बाटली उडवली.

या हल्ल्यात आनंद गंभीररीत्या भाजला असून तो बेशुद्ध झाला. कुटुंबीयांनी तात्काळ त्याला गोरौल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णानंदन यांनी सांगितले की, रुग्णाची स्थिती अत्यंत गंभीर आहे आणि पुढील उपचारांसाठी त्याला मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

गोरौल पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनील कुमार यांनी सांगितले की, सध्या जखमीचा उपचार सुरू असून नातेवाइकांकडून तक्रार प्राप्त होताच गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जाईल.

या घटनेनंतर संपूर्ण गावात संतापाचे वातावरण आहे. केवळ श्राद्धाच्या जेवणास न गेल्याच्या किरकोळ कारणावरून भावानेच भावावर अॅसिड फेक करणे, हे मानवी मूल्यांचा अधःपात दाखवणारे असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

जालन्यात रक्ताच्या थारोळ्यात आढळला तीन वर्षीय मुलीचा मृतदेह, भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्याचा अंदाज

    follow whatsapp