अनैतिक संबंधात ठार वेडी झाली, नवऱ्याचा काटा काढण्यासाठी मैत्रिणीलाही सोबत घेतलं, निर्जनस्थळी नेलं अन्

Raigad crime : अनैतिक संबंधात ठार वेडी झाली, नवऱ्याचा काटा काढण्यासाठी मैत्रिणीलाही सोबत घेतलं, निर्जनस्थळी नेलं अन्

Mumbai Tak

मुंबई तक

20 Oct 2025 (अपडेटेड: 20 Oct 2025, 01:57 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अनैतिक संबंधात ठार वेडी झाली

point

नवऱ्याचा काटा काढण्यासाठी मैत्रिणीलाही सोबत घेतलं

Raigad crime :सध्या विवाहबाह्य संबंधांमुळे होत असलेल्या हत्यांचं प्रमाण प्रचंड वाढलंय.  रायगड जिल्ह्यातील नागोठाणे भागातून असाच प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावरुन ओळख झालेल्या व्यक्तीच्या प्रेमात ठार वेड्या झालेल्या एका महिलेने स्वत:च्या पतीच्या काटा काढण्याचा कटात सहभागी झाली. पतीची हत्या करण्यासाठी या महिलेने तिचा प्रियकर आणि मैत्रिणीची मदतही मिळावली. 

हे वाचलं का?

अधिकची माहिती अशी की, मृतकाचे नाव कृष्णा नामदेव खंडवी (वय 23) असून, तो पाबळ तालुका, पेण येथील रहिवासी होता. त्याच्या पत्नीने उमेश सदु महाकाळ या व्यक्तीच्या आणि सुप्रिया चौधरी या मैत्रिणीच्या साहाय्याने त्याला ठार करण्याचा कट रचला. या घटनेनंतर नागोठाणे पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हेही वाचा ; तीन वर्षांच्या आजारी मुलीला तलावाजवळ सोडलं… मुलीचा दुर्दैवी मृत्यू! वडिलांविरोधात गुन्हा दाखल, मुंबईतील धक्कादायक घटना

तपासात समोर आले आहे की, दिपाली अशोक निरगुडे आणि उमेश यांच्यात विवाहबाह्य संबंध होते. या नात्यामुळे पती कृष्णा अडचणीत पडत असल्याचे त्यांनी ठरवले. त्यामुळे त्यांनी कृष्णाला कायमचा दूर करण्याचा निर्णय घेतला आणि सुप्रिया चौधरीच्या मदतीने खून करण्याची योजना आखली.

सुप्रिया चौधरीने हत्येच्या तयारीसाठी सोशल मीडियावर बनावट खातं तयार केले आणि त्यातून कृष्णाशी संपर्क साधला. काही काळ मैत्री आणि प्रेमाचे गाठी बांधून कृष्णाला जाळ्यात फसवण्यात आलं. त्यानंतर सुप्रियाने कृष्णाला पेण येथून नागोठणे येथील वरसगावच्या डोंगराळ भागात बोलावले. तिथे त्याला निर्जन ठिकाणी नेऊन खून केला. मृतदेहाची ओळख लपवण्यासाठी केमिकलचा वापर केला गेला, तर मोबाईल फोडून जाळ्यात फेकण्यात आला. सध्या या प्रकरणात तिघांनाही पोलीसांनी ताब्यात घेतले आहे, तर नागोठणे पोलीस या हत्येच्या घटनेचा सखोल तपास सुरू ठेवत आहेत.

 इतर महत्त्वाच्या बातम्या 

जालन्यात रक्ताच्या थारोळ्यात आढळला तीन वर्षीय मुलीचा मृतदेह, भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्याचा अंदाज

 

    follow whatsapp