मुलगी संतापून माहेरी आली अन् मागोमाग पतीसुद्धा... सासूने जावयासोबत केला भयानक प्रकार! मुलीनेच आईविरुद्ध केली तक्रार

सासू आणि जावई यांच्यातील वादामुळे भयानक घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सासूने जावयासोबत केला भयानक प्रकार अन्...

सासूने जावयासोबत केला भयानक प्रकार अन्...

मुंबई तक

• 03:17 PM • 20 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुलगी संतापून माहेरी आली अन् मागोमाग पतीसुद्धा...

point

सासूने जावयासोबत केला भयानक प्रकार!

point

मुलीनेच आईविरुद्ध केली तक्रार

Crime News: अहमदाबादच्या नारोल परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे सासू आणि जावई यांच्यातील वादामुळे भयानक घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. किरकोळ कारणामवरून सुरू झालेला हा वाद अगदी टोकाला पोहोचला आणि या भांडणात रागाच्या भरात सासूने तिच्या जावयावर हल्ला करून त्याची निर्घृण हत्या केल्याची माहिती आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

सासूने केला जावयावर हल्ला  

मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर जावई त्याच्या सासरच्या घरी गेला होता. त्यावेळी, त्याने त्याच्या सासूसोबत देखील वाद घालण्यास सुरुवात केली. सासूने तिच्या जावयाला शिवीगाळ करत धमकी दिली. हा वाद टोकाला पोहोचल्यानंतर जावयाने सासूवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा सासूने एक वीट उचलून तिच्या जावयाच्या डोक्यात मारली. हल्ल्यात जखमी झालेला जावई जमिनीवर पडला. इतकेच नव्हे तर, त्यानंतर सुद्धा सासूने लाकडी काठीने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याची निर्घृण हत्या केली.

पत्नीला परत आणण्यासाठी सासरी गेला अन्... 

खरंतर, 2019 मध्ये २७ वर्षीय अंजली नावाच्या महिलेचं परेशभाई लांबा नावाच्या तरुणासोबत लग्न झालं. गेल्या आठवड्यात राजपीपला येथे अंजलीच्या सासरी तिचं पतीसोबत मोठं भांडण झालं. त्यानंतर अंजली तिच्या आईवडिलांच्या घरी गेली. तिचा नवरा परेशभाईने तिला माहेराहून सासरच्या घरी परत आणण्याचा प्रयत्न केला असता परंतु परिस्थिती आणखी बिघडली. 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी, परेशभाई त्याचा मित्र जिग्नेश श्रीमाली सोबत, अंजलीच्या आईवडिलांच्या घरी नारोल येथे बाइकवरून पोहोचला. तिथे जावयाने त्याच्या सासू दिनाबेन वेगडा हिला विचारलं की "तुम्ही तुमच्या मुलीला माझ्या घरी का पाठवत नाही?" याच कारणावरून त्यांच्यात मोठा वाद झाला आणि त्याचं रूपांतर हिंसाचारात झालं.

हे ही वाचा: तीन वर्षांच्या आजारी मुलीला तलावाजवळ सोडलं… मुलीचा दुर्दैवी मृत्यू! वडिलांविरोधात गुन्हा दाखल, मुंबईतील धक्कादायक घटना

मुलीने आईविरुद्ध केली तक्रार दाखल 

रागाच्या भरात, त्याच्या सासूवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, दिनाबेनने लगेच एक वीट उचलली आणि त्याच्या डोक्यात मारली. परेश लगेच खाली पडला. नंतर, सासूने त्याच्यावर काठीने बरेच वार केले आणि यामुळे तो गंभीररित्या जखमी झाला. रुग्णालयात नेल्यानंतर, डॉक्टरांनी परेशला मृत घोषित केलं. या घटनेनंतर अंजलीने तिची आई दिनाबेनविरुद्ध नारोल पोलिस ठाण्यात पतीच्या हत्येचा गुन्हा दाखल केला. तसेच, दिनाबेनने सुद्धा तिचा जावई परेश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि त्यात तिने तिच्या मुलीवर हल्ला आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा जावयावर आरोप केला. पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या तक्रारी नोंदवल्या असून दिनाबेनला अटक केली आहे आणि पुढील तपास सुरू केला आहे.

हे ही वाचा: Govt Job: भारत सरकारच्या 'या' कंपनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! मोठ्या पदांसाठी निघाली भरती अन् पगार 90,000 च्या पुढे..

पोलिसांच्या मते, हे प्रकरण कौटुंबिक वादातून उद्भवलं असून यामध्ये स्वसंरक्षण आणि जाणूनबुजून हत्या असे दोन्ही बाजू आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि जबाबांच्या आधारे सध्या तपास सुरू आहे.

    follow whatsapp