Crime News: झारखंडची राजधानी रांचीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील कांके पिठोरिया रोडवरील शेफ चौपाटी नावाच्या एका रेस्टॉरंटमध्ये व्हेज बिर्याणी ऐवजी नॉन-व्हेज बिर्याणी दिल्यामुळे वाद निर्माण झाला. मात्र, हा वाद इतका टोकाला पोहोचला की, शनिवारी रात्री शेफ चौपाटी रेस्टॉरंटचे मालक विजय कुमार यांची गोळी घालून हत्या करण्यात आली. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. गुन्हेगारांना शोधण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत आणि आरोपींच्या लपण्याच्या संभाव्य ठिकाणांवर छापे टाकले जात आहेत.
ADVERTISEMENT
बिर्याणीवरून झालेल्या वादातून हत्या
बिर्याणीवरून झालेल्या वादातून हत्या झाल्याची बातमी पसरताच परिसरात भितीचं वातावरण पसरलं. स्थानिकांनी पीडित हॉटेल मालक विजयला उपचारांसाठी रांचीतील रिम्स रुग्णालयात दाखल केले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या हत्याकांडाबद्दल लोकांनी संताप व्यक्त केला आहे आणि पोलिसांनी गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. अशा घटनांमुळे जनतेमध्ये भीती आणि दहशतीचं वातावरण निर्माण झाल्याचं ते म्हणाले. गुन्हेगारांना पोलिसांची किंवा कायद्याची भीती राहिलेली नसल्याचं दिसून येत आहेत. आता, या घटनेनंतर स्थानिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा: आमदाराच्या प्रतिनिधीचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद! महिलेसोबत अश्लील डान्स अन्... व्हिडीओ व्हायरल
पोलिसांचा तपास
संबंधित हॉटेल मालकाच्या हत्येची माहिती मिळताच रांचीचे ग्रामीण पोलीस अधिकारी कांके पोलिस ठाण्याच्या पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले. हत्येच्या कारणांबाबत विविध मुद्द्यांवर तपासासोबतच, घटनेत सहभागी असलेल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी रांचीच्या प्रवेश आणि निर्गमन बिंदूंवर शोध मोहीम सुरू करण्यात आली. घटनास्थळी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही पोलिस तपासणी करत आहेत.
हे ही वाचा: MBBS डॉक्टरचा संशयास्पद पद्धतीने मृत्यू! होणाऱ्या बायकोसोबत हॉटेलमध्ये थांबला अन्... पोलिसांचा तपास सुरू
या हत्येमुळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी आज कांके रोडवर आंदोलन केलं. पोलिसांनी गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं. पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, आरोपींना लवकरच अटक केली जाईल. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
