सून सतत जुन्या नोकराला फोनवर बोलायची, सासऱ्याच्या हत्येने कांड उघडकीस

मुंबई तक

• 07:11 AM • 12 Sep 2026

Crime News : कानपूरमधील विनीत मिनोचा हत्या प्रकरणात धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हत्या होत असताना सून शालू पार्टीत नाचत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

सून सतत जुन्या नोकराला फोनवर बोलायची

point

सासऱ्याच्या हत्येने कांड उघडकीस

Crime News : कानपूरमधील प्रसिद्ध औषध विक्रेते विनीत मिनोचा यांच्या हत्या प्रकरणात एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. रतन ऑर्बिट अपार्टमेंटमध्ये 63 वर्षीय विनीत मिनोचा यांच्यावर चाकूने वार करून हत्या केली जात असतानाच, त्यांची सून शालू एका लाउंजमध्ये पती सुब्रतसोबत पार्टी करत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. शालू ‘तुम तो धोखेबाज हो’ या गाण्यावर बेफाम होऊन नाचताना दिसली. तिच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची भीती किंवा तणावाची भावना दिसत नसल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पोलिसांच्या मते, या हत्याकांडाची मास्टरमाइंड शालू असल्याचे मानले जात आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : 'शर्करावगुंठित'.., विद्यानंद बापटांनी पेटऱ्यातून नवा शब्द काढला, अर्थ आहे तरी काय?

तिकडं सून बेफाम नाचली अन् इकडं सासऱ्याचा मर्डर फत्ते 

पोलिसांच्या तपासानुसार आणि लाउंज मॅनेजर सौरभ त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 सप्टेंबरच्या रात्री शालू आणि तिचा पती सुब्रत हे पार्टीसाठी सर्वात आधी पोहोचले होते. रात्री सुमारे 10.30 वाजता दोघांनी लाउंजमध्ये प्रवेश केला. त्यानंतर रात्री 11 वाजताच्या सुमारास इतर पाहुणे येण्यास सुरुवात झाली. पार्टीमध्ये सुमारे 30 ते 35 जण उपस्थित होते. शालू आणि सुब्रत यांनी आरामात जेवणाची ऑर्डर दिली आणि पार्टीमध्ये सहभागी झाले. दोघांनी पार्टीत नृत्यही केले. त्याच वेळी विनीत मिनोचा यांच्या घरात हल्ला करुन हत्या झाली असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.

हेही वाचा : वेदर रिपोर्ट : मराठवाड्याला दिलासा मिळणार? कोणत्या तारखांना मुसळधार पाऊस?

पार्टीतून हत्येसाठी फोनवरुन मार्गदर्शन 

लाउंज मॅनेजरच्या माहितीनुसार, त्यांच्या लाउंजमधील पार्टी साधारणपणे रात्री 2 ते 2.30 वाजेपर्यंत संपते. मात्र, त्या रात्री शालू आणि पार्टीतील इतर पाहुण्यांच्या विनंतीवरून डीजेने सुमारे रात्री 3 वाजेपर्यंत गाणी सुरू ठेवली. डीजे दीपकने सांगितले की, शालू वारंवार शेवटचे गाणे वाजवण्याची विनंती करत होती. मॅनेजर आणि डीजे या दोघांनीही शालूच्या वागण्यात कोणताही तणाव जाणवत नसल्याचे सांगितले. हत्याकांडाची माहिती मिळाल्यानंतर मात्र दोघांनाही धक्का बसला. पोलिसांच्या तपासानुसार, शालू पार्टीला जाण्याची पूर्ण तयारी करून घरातून निघाली होती आणि पार्टीदरम्यानही ती फोनवरून हत्यारांना मार्गदर्शन करत असल्याचा आरोप आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हत्या केल्यानंतर घरातील नोकरांनी शालूला फोन करून काम पूर्ण झाल्याची माहिती दिली. त्यानंतर रात्री सुमारे 3 वाजता शालू, तिचा पती आणि मुलासोबत घरी परतली. घरी आल्यानंतर तिने मोठमोठ्याने रडण्याचा आणि ओरडण्याचा नाटक केल्याचा आरोप आहे. 5 सप्टेंबर रोजी विनीत मिनोचा यांच्यावर त्यांच्या फ्लॅटमध्ये 26 पेक्षा अधिक वेळा चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे जुना नोकर विशाल गौतम आणि त्याचा साथीदार राजकिशोर यांना एन्काउंटरनंतर अटक केली. चौकशीत आरोपींनी शालूने ही हत्या घडवून आणल्याचे सांगितल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सासऱ्यांबद्दलचा राग आणि कमी पैसे मिळत असल्याने त्रस्त होऊन शालूने ही योजना आखल्याचा आरोप आहे. हत्येसाठी तिने 6 लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यापैकी 2 लाख रुपये आगाऊ आणि उर्वरित 4 लाख रुपये 15 दिवसांनी देण्याचे ठरले होते.