सख्खा भाऊ बनला पक्का वैरी, वीट घालून केली हत्या, बॉडी मोकळ्या प्लॉटमध्ये फेकली

सुमित भुजबळ

• 06:44 AM • 14 Nov 2026

Crime News : घराच्या मालमत्तेवरून झालेल्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. हत्येनंतर मृतदेह रिकाम्या प्लॉटमध्ये फेकण्यात आला.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

सख्खा भाऊ बनला पक्का वैरी

point

वीट घालून केली हत्या, बॉडी मोकळ्या प्लॉटमध्ये फेकली

Crime News : घराच्या मालमत्तेवरून सुरू असलेल्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. वीट घालून हत्या केल्यानंतर मृतदेह शेजारील रिकाम्या प्लॉटमध्ये फेकण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरच्या हनुमंत विहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या संजय गांधी नगरमध्ये ही घटना घडली. 

हे वाचलं का?

आनंद सिंह उर्फ रगडू (वय 40) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर त्याच्या 37 वर्षीय लहान भावाचे नाव प्रियम सिंह आहे. दोघांमध्ये घराच्या मालमत्तेवरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. यापूर्वीही दोघांमध्ये अनेकदा भांडणे झाली होती. हा वाद पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईदेखील केली होती. मात्र, त्यानंतरही दोघांमधील तणाव कमी झाला नव्हता. रविवारी रात्री दोघेही नशेत असताना पुन्हा त्यांच्यात वाद सुरू झाला. सुरुवातीला झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. याचदरम्यान प्रियमने वीट उचलून आनंदवर हल्ला केला. या हल्ल्यात आनंदचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह शेजारी असलेल्या सचिन कुमार पाल यांच्या रिकाम्या प्लॉटमध्ये फेकून देण्यात आल्याचा आरोप आहे.

हेही वाचा : 'गोकुळमध्ये शासननियुक्त संचालक नेमण्याचं षडयंत्र 'त्या' दोन नेत्यांचं', सतेज पाटील मुश्रीफांवर संतापले

घराच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाची केली हत्या

हत्येनंतर प्रियम सिंह घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेत प्रियमची पत्नी आणि मुलगी यांचीही भूमिका असल्याचा संशय पोलिसांना आहे. स्थानिक नागरिकांनी तिघांनी मिळून आनंदला मारहाण केल्याचा आरोप केला आहे. घटनेपूर्वी घराबाहेर लावण्यात आलेला सीसीटीव्ही कॅमेराही बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा कॅमेरा नेमका कधी आणि कोणी बंद केला, याचाही तपास पोलीस करत आहेत. तसेच हत्या झाली त्यावेळी कुटुंबातील इतर सदस्य कुठे होते, याची माहितीही घेतली जात आहे. सोमवारी सकाळी रिकाम्या प्लॉटमध्ये मृतदेह पडल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर हनुमंत विहार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक पथक आणि श्वानपथकालाही बोलावण्यात आले.

दरम्यान, पोलिसांनी मुख्य आरोपी प्रियम सिंह याच्या पत्नीला आणि अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र, मुख्य आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दक्षिण विभागाचे पोलीस उपायुक्त दीपेंद्र नाथ चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही भावांमध्ये घरावरून बऱ्याच काळापासून वाद सुरू होता. यापूर्वीही भांडण झाल्यानंतर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. रविवारी रात्री पुन्हा दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. कुटुंबीयांकडून तक्रार मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. ताब्यात घेतलेल्या कुटुंबीयांची चौकशी आणि घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलीस तपास करत आहेत. या हत्येमध्ये अन्य कोणाचा सहभाग होता का, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.