तू चिकनचे पिस का खाल्लेस? मित्रानेच मित्रावर चाकूने हल्ला करत संपवलं

मुंबई तक

01 Sep 2026 (अपडेटेड: 01 Sep 2026, 03:21 PM)

Crime News : एका पार्टीमध्ये मित्राचा एकमेकांशी चिकनच्या पिसवरून वाद निर्माण झाला होता. हा वाद इतका टोकाला गेला की, मित्राने मित्राचीच चिकनच्या पिसवरून हत्या केली.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

चिकन खाल्ल्याने मित्राने जीवलग मित्राला संपवलं

point

हत्येचा संशय निर्माण होऊ नये म्हणून रचला बनाव

Crime News : एका पार्टीमध्ये मित्राचा एकमेकांशी चिकनच्या पिसवरून वाद निर्माण झाला होता. हा वाद इतका टोकाला गेला की, मित्राने मित्राचीच चिकनच्या पिसवरून हत्या केली.  ही घटना कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील मुदलगी तालुक्यातील आहे. आरोपीची  अरुण कुमार अशी ओळख समोर आली. तर मृत तरुणाची सीताराम अशी ओळख समोर आली होती. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : माणुसकीला काळिमा! तीन महिन्यांच्या चिमुकलीचा पुरलेला मृतदेह काढला बाहेर

चिकन खाल्ल्याने मित्राने जीवलग मित्राला संपवलं

अरुण आणि सीताराम हे दोघेही चांगले मित्र होते, मात्र चिकनच्या पिसवरून दोघांमध्ये अचानकपणे बिनसलं आणि होत्याचं नव्हतं झालं. सीतारामने अधिक चिकन खाल्ल्याने अरुणचा ताबा सुटला आणि त्याने सीतारामवर चाकूने हल्ला करत संपवलं. 

हत्येचा संशय निर्माण होऊ नये म्हणून रचला बनाव

आरोपी अरुणने सीतारमला संपवल्यानंतर तो भयभीत झाला, त्याने आपल्यावर हत्येचा संशय निर्माण होऊ नये म्हणून खोटा बनाव रचला होता. त्याने जखमी झालेल्या सीतारामला सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. तिथे, डॉक्टरांची आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. सीताराम इमारतीवरून पडल्याचा त्याने दावा केला होता. 

हे ही वाचा : मोठ्या-मोठ्या शहरांमधील तरूणी आणि सेक्स रॅकेट, सत्य समोर आलं अन्...

डॉक्टर आणि पोलिसांना अरुणच्या बनावट गोष्टीवर लगेचच संशय व्यक्त करण्यात आला. रुग्णालयात पोहोचल्यावर पोलिसांनी अरुण कुमारला तात्काळ ताब्यात घेत कसून चौकशी केली होती. पोलिसांच्या या कठोर कारवाईनंतर आरोपीने चिकनच्या पिसवरून वाद झाल्याने चाकूने हल्ला केल्याची कबुली दिली. दरम्यान, उपचार सुरू असताना सीतारामचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत.