गर्लफ्रेंडसमोर प्रवेश नाकारल्याने अपमानाची भावना, गेटकिपरसोबत भयंकर घडलं?

मुंबई तक

31 Aug 2026 (अपडेटेड: 31 Aug 2026, 03:25 PM)

Crime News : इंदूरमध्ये टाउनशिपमध्ये प्रवेश नाकारल्याच्या वादातून गेटकीपरला कारने चिरडल्याचा आरोप आहे. गर्लफ्रेंडसमोर अपमान झाल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांचे म्हणणे असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

गर्लफ्रेंडसमोर प्रवेश नाकारल्याने अपमानाची भावना

point

गेटकिपरसोबत भयंकर घडलं?

Crime News : इंदूरमधील लॉ-एक्झोटिका या मोठ्या सोसायटीमध्ये प्रवेश नाकारल्याच्या वादातून एका तरुणाने गेटकीपरला कारने चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गर्लफ्रेंडसमोर आपला अपमान झाल्याचा राग मनात ठेवून तरुण काही वेळाने पुन्हा कार घेऊन आला आणि गेटवर उभ्या असलेल्या लोकांना धडक दिल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या घटनेत धर्मेंद्र मालवीय या चौकीदाराचा मृत्यू झाला असून, सुरुवातीला अपघात वाटणारे हे प्रकरण आता हत्येत बदलले आहे. पोलिसांनी राजा उर्फ कमल कुमावत आणि त्याची गर्लफ्रेंड सेजल उर्फ शालिनी यांना अटक केली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : महिलेचा परपुरुषावर जीव जडला, दारु पिऊन मारहाण करणाऱ्या पतीला गळा आवळून संपवलं

गर्लफ्रेंडसमोर प्रवेश नाकारल्याने संतापला, थेट गेटकिपरला चिरडलं 

ही घटना इंदूरच्या लसूड़िया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लॉ-एक्झोटिका टाउनशिपमध्ये घडली. 35 वर्षीय धर्मेंद्र मालवीय हे टाउनशिपमध्ये चौकीदार म्हणून कार्यरत होते आणि कुटुंबासह तिथेच राहत होते. घटनेच्या रात्री राजा उर्फ कमल कुमावत हा आपली गर्लफ्रेंड सेजलसोबत कारमधून टाउनशिपमध्ये आला होता. गेटवर ड्युटीवर असलेल्या धर्मेंद्र यांनी कार थांबवून आत जाण्याबाबत विचारणा केली. पोलिसांच्या तपासानुसार, याच मुद्द्यावरून कमल आणि धर्मेंद्र यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद वाढल्यानंतर धर्मेंद्र यांची पत्नी ज्योती आणि त्यांचा नातेवाईक गोविंद हेही घटनास्थळी आले. कमलने धर्मेंद्र यांच्यासोबत मारहाण केल्याचा आरोपही पोलिस तपासात समोर आला आहे.

हेही वाचा : कोथरुडच्या कुलकर्णी आणि पेठेतले बापट, ध्वनी प्रदुषणावर बेधडक चर्चा VIDEO

 कारने तिघांना धडक दिल्याचा आरोप

वाद सुरू असताना कमलने आपण टाउनशिपच्या कॉलोनायझरचा परिचित असल्याचे सांगितले. त्याने फोनवरूनही चर्चा केली आणि सुपरवायझरशी देखील बोलणे झाले. मात्र, त्यानंतरही वाद शांत झाला नाही. अखेर कमल कार घेऊन तेथून निघून गेला. मात्र, काही वेळाने तो पुन्हा त्याच कारमधून टाउनशिपमध्ये परतला. पोलिसांच्या आरोपानुसार, यावेळी कारचा वेग जास्त होता आणि गेटजवळ धर्मेंद्र, त्यांची पत्नी ज्योती आणि नातेवाईक गोविंद उभे होते. कमलने कारने तिघांना धडक दिल्याचा आरोप आहे. या धडकेत ज्योती आणि गोविंद जखमी झाले. त्यानंतर कार पुन्हा वळवून धर्मेंद्र यांना लक्ष्य करण्यात आल्याचा पोलिसांचा आरोप आहे. कमलने धर्मेंद्र यांच्या अंगावर दोन वेळा कार घातल्याचे बोलले जात आहे.

या घटनेत धर्मेंद्र यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला ही घटना कारच्या धडकेत झालेला अपघात असल्याचे दिसत होते. मात्र, तपास पुढे गेल्यानंतर पोलिसांसमोर या घटनेचा वेगळा घटनाक्रम आला. कार घेऊन निघून गेल्यानंतर कमल पुन्हा का परतला, कारची दिशा का बदलली आणि धर्मेंद्र यांना पुन्हा चिरडल्याचा आरोप का समोर आला, याचा तपास पोलिसांनी सुरू केला. पोलिसांच्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांच्या मृत्यूनंतर कमल आपली गर्लफ्रेंड सेजलला घेऊन तेथून निघून गेला आणि दोघे उज्जैनला गेले. त्यानंतर दोघांनी मोबाईल फोन बंद केले. पोलिसांनी संभाव्य ठिकाणी शोध घेतल्यानंतर शुक्रवारी रात्री कमल आणि सेजलला अटक केली. हत्येसाठी वापरलेली कारही पोलिसांनी जप्त केली असून, दोघांची चौकशी सुरू आहे.