महिलेचा परपुरुषावर जीव जडला, दारु पिऊन मारहाण करणाऱ्या पतीला गळा आवळून संपवलं
Crime News : बुलंदशहरमध्ये पत्नीने पतीची गमछाने गळा आवळून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधांचा विरोध आणि पतीकडून होणाऱ्या मारहाणीच्या आरोपांनंतर पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पत्नीचा परपुरुषावर जीव जडला,
दारु पिऊन मारहाण करणाऱ्या पतीला गळा आवळून संपवलं
UP Crime News : उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील बहलीमपुरा गावात पत्नीने पतीची गमछाने गळा आवळून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्रीती असे आरोपी पत्नीचे नाव असून कृष्ण कुमार असे मृत पतीचे नाव आहे. अनैतिक संबंधांना विरोध आणि दारू पिऊन पतीकडून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून प्रीतीने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. घटनेच्या वेळी या दाम्पत्याची आठ वर्षांची मुलगी घरातच उपस्थित होती. पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली असून हत्येसाठी वापरण्यात आलेला गमछाही जप्त केला आहे.
हेही वाचा : Personal Finance: तुमच्या नावावर कुठे-कुठे आहे पैसा? एका दिवसात 'असा' शोधा सगळा पैसा!
नवऱ्याचा गळ्यावर संशयास्पद खुणा, अन् नातेवाईकांचा संशय वाढला
घटनेनंतर प्रीती नातेवाईक येण्यापूर्वीच कृष्ण कुमार यांच्या अंत्यसंस्काराची तयारी करत होती. मात्र, नातेवाईक घरी पोहोचल्यानंतर त्यांनी कृष्ण कुमार यांच्या गळ्यावर संशयास्पद खुणा पाहिल्या. त्यांना संशय आल्याने त्यांनी तत्काळ डायल-112 वर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि कृष्ण कुमार यांचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. नातेवाईकांना संशय आल्यामुळे या घटनेचा खुलासा झाल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा : कोथरुडच्या कुलकर्णी आणि पेठेतले बापट, ध्वनी प्रदुषणावर बेधडक चर्चा VIDEO
