माणुसकीला काळिमा! तीन महिन्यांच्या चिमुकलीचा पुरलेला मृतदेह काढला बाहेर

मुंबई तक

• 01:14 PM • 01 Sep 2026

Crime News : माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तीन महिन्यांच्या चिमुकलीच्या निधनानंतर तिचा मृतदेह जमिनीत पुरण्यात आला. जिथे मुलीवर अत्यंसंस्कार करण्यात आले होते, त्याच जमिनीच्या वादातून आरोपीने हे कृत्य केल्याची माहिती आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार

point

जमिनीच्या वादातून अत्यंसंस्कार केलेल्या तीन महिन्यांच्या बाळाचा मृतदेह बाहेर काढला

Crime News : माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तीन महिन्यांच्या चिमुकलीच्या निधनानंतर तिचा मृतदेह जमिनीत पुरण्यात आला. जिथे मुलीवर अत्यंसंस्कार करण्यात आले होते, त्याच जमिनीच्या वादातून आरोपीने हे कृत्य केल्याची माहिती आहे. आरोपी इथवर न थांबता त्याने मुलीचा मृतदेह हा तिच्या कुटुंबियांच्या घराच्या दरवाजासमोर फेकून दिला होता. या घटनेनंतर परिसरात आक्रोश निर्माण झाला होता. ग्रामस्थांनी या घटनेचा विरोध करत ते रस्त्यावर उतरले होते. ही घटना मध्य प्रदेशातील छत्तीसगडच्या ग्वालियर येथील आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Astrology : आज 1 सप्टेंबर, पहिल्याच दिवशी चार राशींना होणार मोठा फायदा

चिमुकलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले तिच जागा उकरली

घटनेनुसार, चिमुकल्या तीन महिन्यांच्या मुलीचा रविवारी मृ्त्यू झाला होता. कुटुंबियांनी चिमुकलीवर अंत्यसंस्कार केले होते. दरम्यान, ज्या ठिकाणी चिमुकलीवर अत्यंसंस्कार करण्यात आले त्याच जागेवरून वाद निर्माण झाला होता. कुटुंबियांनी आरोप केला, जिथे चिमुकलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले तिच जागा खोदण्यात आली होती. चिमुकलीचा मृतदेह पाहून तिच्याच कुटुंबियांना मोठा धक्का बसला होता. 

या घटनेनं ग्रामस्थांसह नातेवाईक रस्त्यावर

या घटनेनंतर ग्रामस्थ मंडळी आणि नातेवाईक हे रस्त्यावर उतरले होते. त्यांनी मुलीचा मृतदेह रस्त्यावर ठेवत आंदोलन केले. ग्रामस्थांनी आरोपी विरोधात कठोर कारवाईची मागणी केली. आंदोलन सुरू असताना तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. माहितीनुसार, दोन्ही गटांमध्ये वाद आणि मारहाण झाली होती. 

हे ही वाचा : संपदा मुंडेंनंतर फलटण उपजिल्हा रुग्णालयातील आणखी एका डॉक्टरची आत्महत्या

या घटनेची पोलिसांना सूचना देण्यात आली असता, पोलिसांनी ग्रामस्थांची समजूत काढली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांच्या उपस्थितीत मुलीच्या मृतदेहावर दुसऱ्याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले.