चंद्रपूर : ‘पूजेचे सामान घेऊन ये’, पतीला घराबाहेर पाठवून भोंदूबाबाचा महिलेवर अत्याचार

मुंबई तक

01 Sep 2026 (अपडेटेड: 01 Sep 2026, 12:35 PM)

chandrapur crime : ग्रहशांती आणि कालसर्पदोष निवारणाच्या नावाने 27 वर्षीय विवाहितेवर अत्याचार केल्याचा आरोप. भिसी पोलिसांनी मुख्य आरोपी शुभम खंगारसह दोन साथीदारांना अटक केली.

chandrapur crime

chandrapur crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

चंद्रपूर : ‘पूजेचे सामान घेऊन ये’,

point

पतीला घराबाहेर पाठवून भोंदूबाबाचा महिलेवर अत्याचार

Chandrapur crime, चंद्रपूर : ग्रहशांती आणि कालसर्पदोष निवारणाच्या नावाखाली एका भोंदू महाराजाने 27 वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत उघडकीस आली आहे. या प्रकरणी भिसी पोलिसांनी मुख्य आरोपी शुभम खंगार याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात पावसाचा वेग मंदावला, नवं संकट समोर

पतीला पूजेचे सामान आणण्यासाठी पाठवले अन् केला बलात्कार 

मिळालेल्या माहितीनुसार, 27 वर्षीय पीडित महिलेच्या पतीची प्रकृती वारंवार बिघडत होती. त्यामुळे ग्रहशांती आणि कालसर्पदोष निवारणासाठी त्यांनी शुभम महाराजांसोबत पूजेसाठी संपर्क केला होता. त्यानुसार रविवारी मध्यरात्री पीडित महिलेच्या घरी पूजा करण्यात आली. यावेळी आरोपींनी पीडितेच्या पतीला पूजेचे सामान आणण्यासाठी घराबाहेर पाठवले.

हेही वाचा : 'शिदेंनी परभणीचा मेळावा रद्द केला होता, पळायला सुद्धा जागा राहिली नसती'

आरोपीने पीडित विवाहितेवर बलात्कार केल्याचा आरोप

पती घराबाहेर गेल्यानंतर आरोपीने पीडित विवाहितेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही घटना घडल्यानंतर पीडित महिलेने याबाबत आपल्या पतीला आणि घरच्यांना माहिती दिली. त्यानंतर पीडितेने आरोपींविरोधात भिसी पोलीस स्टेशनमध्ये काल सकाळी तक्रार दाखल केली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई सुरू केली.

या प्रकरणात भिसी पोलिसांनी शुभम खंगार याच्यासह त्याला मदत करणारे त्याचे दोन साथीदार सचिन मोडक आणि तेजस वालकटे यांना अटक केली आहे. या तिघांविरोधात कारवाई करण्यात आली असून भिसी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.