'शिदेंनी परभणीचा मेळावा रद्द केला होता, पळायला सुद्धा जागा राहिली नसती'

मुंबई तक

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या परभणी दौऱ्याबाबत मोठा दावा केला आहे. आपल्या इशाऱ्यानंतर शिंदेंनी कार्यक्रम रद्द केला होता, असं जरांगे म्हणाले.

ADVERTISEMENT

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil
Google CTA

बातम्या हायलाइट

point

Manoj Jarange: 'एकनाथ शिंदे परभणीतला खा. बंडू जाधवांचा मेळावा रद्द केला होता'

point

उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जरांगे पाटलांचा गौप्यस्फोट

Manoj Jarange Patil, जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परभणी दौऱ्याबाबत मोठा दावा केला आहे. खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याला एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. या मेळाव्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी संजय जाधवांना हा मेळावा रद्द करण्याचा इशारा दिला होता. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी बोलताना जरांगे यांनी आपल्या इशाऱ्यानंतर एकनाथ शिंदे यांनी हा मेळावाच रद्द केला होता, असा दावा केला.

हेही वाचा : गाडी शिकवण्याच्या बहाण्याने 17 वर्षीय मुलीचा विनयभंग, लोकांनी आरोपीचा टक्कल करत फिरवलं

"जरांगे पाटलांनी सूट दिल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं अन्..." 

मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांनी दौरा रद्द केल्याचा मेसेज सुरुवातीला आला होता. मात्र, त्यानंतर काही मिनिटांनी पुन्हा एका अधिकाऱ्यांकडून कार्यक्रम घेण्यास अडचण नसल्याचा संदेश देण्यात आला. जरांगे पाटलांनी सूट दिलीये, असं अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं.  हा संदेश परभणी, हिंगोली, नांदेड किंवा लातूर येथील अधिकाऱ्यांपैकी कोणाकडून आला, याबाबत जरांगे यांनी नाव घेण्यास नकार दिला. मात्र, सुरुवातीला दौरा रद्द करण्यात आला होता, असा दावा त्यांनी केला.

हेही वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला पंतप्रधानांचा फोटो, अमित ठाकरेंनी काय केलं?