गाडी शिकवण्याच्या बहाण्याने 17 वर्षीय मुलीचा विनयभंग, लोकांनी आरोपीचा टक्कल करत फिरवलं
Crime News : एका तरुणीला गाडी शिकवण्याच्या बहाण्याने नराधमाने पीडितेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना आहे. ही घटना परिसरातील लोकांना समजताच त्यांनी पीडितेला बेदम मारहाण केली होती, नंतर तरुणाचा टक्कल करत पोलिसांच्या ताब्यात दिले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
17 वर्षीय मुलीला कार शिकवण्याऐवजी चालकाने केला विनयभंग
कुटुंबियांसह लोकांनी कार चालकाला बदडत केला टक्कल
Crime News : एका तरुणीला गाडी शिकवण्याच्या बहाण्याने नराधमाने पीडितेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना आहे. ही घटना परिसरातील लोकांना समजताच त्यांनी पीडितेला बेदम मारहाण केली होती, नंतर तरुणाचा टक्कल करत पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, या घटनेचा एकूण तपास करत आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील कानपूर येथील रावतपुर येथील आहे. या घटनेनं लोकांमध्ये संतापाची लाट आहे.
हे ही वाचा : शौचासाठी गेलेल्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल
17 वर्षीय मुलीला कार शिकवण्याऐवजी चालकाने केला विनयभंग
रावतपुर येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने आपल्या 17 वर्षीय मुलीला कार शिकवण्यासाठी सांगितले होते. मागील काही दिवसांपासून चालक पीडितेला कार चालवण्यास शिकवत होता. सोमवारी कार चालकाने पीडितेची छेड काढत विनयभंग केला. तेव्हा कुटुंबियांना या घटनेची माहिती देण्यात आली होती.
कुटुंबियांसह लोकांनी कार चालकाला बदडत केला टक्कल
या घटनेची माहिती पीडितेच्या कुटुंबियांना मिळाल्यानंतर, परिसरातील लोकांनी मिळून चालकाला बेदम मारहाण केली. नंतर त्या तरुणाचे केस कापून गल्लीतून फिरवण्यात आले होते. आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे वृत्त आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाल्याचे वृत्त आहे.
हे ही वाचा : 'टीका करा, पण मी दोन वेळा तिथं गेलो..' जरागेंना शिंदेंचं उत्तर
पोलिसांनी आरोपीला रुग्णालयात पाठवले आणि प्रकरणाचा पुढील तपास सुरू ठेवला आहे. या घटनेचा एकूण तपास सुरू असून यामागे नेमकं कोण आहे, त्याचा हेतू काय याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
