शौचासाठी गेलेल्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल

मुंबई तक

Crime news : एका अल्पवयीन विद्यार्थिनी शौचालयात जाताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलेला आहे. वर्ग सुरू असताना इयत्ता नववीच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार आहे.

ADVERTISEMENT

Crime news (AI Photo)
Crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

कपडे फाडून पीडितेवर केले अत्याचार 

point

जीवे मारण्याची पीडितेला धमकी

Crime news : एका अल्पवयीन मुलीसोबत शाळेच्या शौचालयात गेलेल्या मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलेला आहे. वर्ग सुरू असताना इयत्ता नववीच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार आहे. या प्रकरणी आरोपीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. ही घटना ओडिशातील नबरंगपुर जिल्ह्यातील तेंतुलीखुंटी पोलीस ठाणे क्षेत्रातील आहे. 

हे ही वाचा : स्लीपर कोचमध्ये 16 वर्षीय मुलीवर कंडक्टर आणि ड्रायव्हरकडून अत्याचार

कपडे फाडून पीडितेवर केले अत्याचार 

21 ऑगस्ट रोजी तेंतुलीखुंटी पोलीस ठाणे क्षेत्रातील एका हाय स्कूलमध्ये शिक्षण घेते. या घटनेदरम्यान वर्गात शिकवणी सुरू होती. मधल्या सुट्टीनंतर सहाव्या तासादरम्यान विद्यर्थिनी शाळेच्या परिसरातून बाहेर पडली होती. यादरम्यान एक व्यक्तीने पीडितेचं तोंड दाबलं. यानंतर कथितरित्या कपडे देखील फाडण्यात आले होते, नंतर तिच्यावर अत्याचार केला. 

जीवे मारण्याची पीडितेला धमकी

आरोपीने विद्यार्थिनीच्या मानेवर चाकू लावून तिला धमकावले आणि हत्येची धमकी दिली. तो एवढ्यावरच न थांबता म्हणाला की, जर कोणाला काही सांगितल्यास जीवे मारेन. या घटनेनंतर पीडित विद्यार्थिनी भयभीत झाली होती. तिने आपल्या शाळेतील शिक्षिकेला या घटनेची माहिती दिली होती. विद्यार्थिनीसोबत शाळेत पोहोचताच शाळेच्या अधिकाऱ्यांनी पीडितेची मदत केली आणि नंतर तिला कपडे दिले. या घटनेची कुटुंबियांना माहिती मिळाली. 

हे ही वाचा : 'टीका करा, पण मी दोन वेळा तिथं गेलो..' जरागेंना शिंदेंचं उत्तर

कुटुंबियांनी पोलीस ठाणे गाठून आरोपीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. शाळेच्या व्यवस्थापक कमिटीने पोलीस ठाण्याशी संपर्क साधत आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती. दरम्यान, शाळेच्या सभोवतालते कॅमेरे तपासून सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल फोन, कॉल डिटेल्सची तपासणी केली होती. जो व्यक्ती आरोपी म्हणून दोषी असेल त्याला कठोर कायद्यांन्वये गुन्हा दाखल केला जाईल असे सांगितलं.