'टीका करा, पण मी दोन वेळा तिथं गेलो..' जरागेंना शिंदेंचं उत्तर
Eknath Shinde : परभणीत खासदार बंडू जाधवांनी आयोजित केलेल्या मेळाव्याला अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटलांनी आव्हान दिले होते. इकडे मराठ्यांचे उपोषण सुरू असताना एकनाथ शिंदे परभणीत मेळावा कशासाठी घेत आहेत? असा प्रश्न आता मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला, त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलेय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
परभणीत खासदार बंडू जाधवांचा मेळावा
मेळाव्यात काय म्हणाले एकनाथ शिंदे?
Eknath Shinde : परभणीत खासदार बंडू जाधवांनी आयोजित केलेल्या मेळाव्याला अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटलांनी आव्हान दिले होते. इकडे मराठ्यांचे उपोषण सुरू असताना एकनाथ शिंदे परभणीत मेळावा कशासाठी घेत आहेत? असा प्रश्न आता मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. त्याला एकनाथ शिंदेंनी मेळाव्यातून प्रत्युत्तर देण्याचे काम केले आहे.
नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
"आज मी आपल्याला एवढं सांग हा शेतकरी मेळावा मगाशी बंडूभाऊ आपण सांगितलं की, मनोज जनांगे पाटील यांनी फोन केला होता की हे आपल्याला स्थगित करावं परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो हा मेळावा शेतकऱ्या आणि युवकांचा दोन महिन्यापासून त्याची तयारी चालू होती. कालपासून मराठवाड्यातली लोकं या ठिकाणी आली आणि ऐनवेळी आपण मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमची बाजू देखील या ठिकाणी आपण समजून घेतली पाहिजे की एकदा रद्द झाला होता. अगोदर आणि आज हा मेळावा या ठिकाणी होतोय मी आपल्याला सांगतो शेतकरी ही शेतकरी मेळावा आहे आणि या शेतकऱ्यांचा आणि मराठा समाजाचा आणि या ठिकाणी सगळा समाज आहे".
पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, "सर्वच समाजातील लोक शेतकरी वर्गातील आहेत. मराठा समाज देखील मोठ्या प्रमाणावर इथे आला. मी या ठिकाणी सांगू इच्छितो, हा बळीराजा आपला पोशिंदा आहे हा बळीराजा आपला मायबाप आहे हा बळीराजा आपला अन्नदाता आहे आणि म्हणून कुठलही राजकारण या शेतकऱ्यांच्या आड येता कामान भूमिका मनोज जरांगे पाटील यांची पण आहे. आमची पण आहे मनोज जरांगे पाटील यांची तळमळ मला माहित आहे."
'कोणाचंही आरक्षण कमी न करता आरक्षण दिले'
"सर्वसामान्य कार्यकर्ता या समाजासाठी लढतोय आणि मी मुख्यमंत्री असताना दोन वेळा तिथे गेलो दोन वेळा त्यांना भेटी दिल्या, आता देखील मुख्यमंत्री देवेंद्रजीनी आणि मी आपले मंत्री पाठवले कायद्यात ज्या काही बाबी आहेत त्या तपासण्यासाठी खरं म्हणजे मराठा समाज हा कष्टकरी आहे. खरं म्हणजे इतर समाजाच ओबीसी इतर समाजाचे कुणाचाही आरक्षण कमी न करता आपल्याला आरक्षण देण्याची भूमिका आपण घेतली.
