व्हायग्रा खाऊन गर्लफ्रेंडवर दुसऱ्यांदा बलात्काराचा प्रयत्न, पण भयंकर हत्याकांड घडलं
Crime News : फिरोजाबादमधून धक्कादायक घटना समोर आलीये. 22 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा 23 वर्षीय तरुणावर आरोप आहे. पुन्हा संबंध ठेवण्यास विरोध केल्यानंतर हत्या केल्याचा पोलिसांचा दावा असून, मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
व्हायग्रा खाऊन गर्लफ्रेंडवर दुसऱ्यांदा बलात्काराचा प्रयत्न
पण भयंकर हत्याकांड घडलं
UP Crime News : उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे 23 वर्षीय तरुणाने आपल्या 22 वर्षीय गर्लफ्रेंडवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या वाढदिवसानिमित्त 26 ऑगस्ट रोजी तरुणीला भेटण्यासाठी बोलावले होते. दोघांची आधीपासून ओळख होती आणि त्यांनी बारावीपर्यंत एकत्र शिक्षण घेतले होते. तरुणी मूळची फिरोजाबादची असून गुरुग्राममधील एका कंपनीत काम करत होती. रक्षाबंधनाच्या निमित्ताने ती आपल्या गावाकडे परतत असताना आरोपीने तिला भेटण्यासाठी बोलावल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा : Personal Finance: तुमच्या नावावर कुठे-कुठे आहे पैसा? एका दिवसात 'असा' शोधा सगळा पैसा!
क्स पॉवर वाढवणारी औषधाची गोळी घेतली अन् केला बलात्कार
पोलिसांच्या तपासानुसार, आरोपीने तरुणीला भेटण्याच्या बहाण्याने थांबवले आणि तिला घरी जाऊ दिले नाही. त्यानंतर तो तिला फिरोजाबादमधील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. आरोपानुसार, हॉटेलच्या खोलीत आरोपीने सेक्स पॉवर वाढवणारी औषधाची गोळी घेतली आणि तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर पुन्हा संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्यावर तरुणीने विरोध केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, विरोध केल्याने संतापलेल्या आरोपीने तिच्यावर मारहाण केली. या घटनेत तिचा मृत्यू झाला. तपासादरम्यान पोलिसांना आरोपीकडून तरुणीचा मोबाइल फोन आणि सेक्स पॉवर वाढवणारी औषधाची गोळी मिळाल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा : ‘किती कोणात दम.. धिंगाणा होईल बेट्या’ जरांगे प्रचंड चिडले! काय बोलून गेले?
