‘किती कोणात दम.. धिंगाणा होईल बेट्या’ जरांगे प्रचंड चिडले! काय बोलून गेले?
Manoj Jarange Patil : परभणीतील एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले. कार्यक्रम रद्द न केल्यास तिथे येण्याचा इशारा देत जरांगेंनी खासदार संजय जाधवांना दम दिला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
Manoj Jarange आता प्रचंड चिडले
खुन्नस, धिंगाणा, बेट्या म्हणत कोणाचा दम काढला?
Manoj Jarange Patil, जालना : परभणीत रविवारी (दि.30) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेतकरी आणि युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या वतीने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. संजय जाधवांच्या शिंदेसेनेतील प्रवेशानंतर ठाकरे सेनेतील काही पदाधिकारी आणि नेतेही शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, या कार्यक्रमावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत उपोषण सुरू असताना परभणीत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमावर जरांगेंनी नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा : लग्नानंतर सतत आजारी पडू लागला नवरदेव, महिन्याभरात बायकोवर संशय आला अन् घडलं भयंकर
"तर मी तिकडं येत असतो, तिथं मग लय धिंगाणा होईल"
संजय जाधव यांच्याशी फोनवर संवाद साधताना, “आपल्यासाठी समाज महत्त्वाचा आहे. हा कार्यक्रम तात्काळ रद्द करा, अन्यथा मी तिथं येईल,” असं म्हणत मनोज जरांगेंनी संजय जाधवांना दम दिला. कार्यक्रम झाल्यास आपण तिथे जाणार असल्याचेही जरांगे यांनी म्हटले. “कार्यक्रम केला तर मी तिकडं येत असतो. तिथं मग लय धिंगाणा होईल,” असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला. मैदानात उतरल्यावर विचार करायचा नसतो आणि जोपर्यंत जीवात जीव आहे, तोपर्यंत समाजासाठी मैदानात लढत राहणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.
हेही वाचा : दीराचे वहिनीसोबत अनैतिक संबंध, शेवटी पलंगाखाली आढळला मृतदेह; काय घडलं?
