दीराचे वहिनीसोबत अनैतिक संबंध, शेवटी पलंगाखाली आढळला मृतदेह; काय घडलं?

मुंबई तक

एका व्यक्तीचे वहिनीसोबत अनैतिक संबंध होते. याची माहिती बायकोला कळताच या नात्याचा भयंकर शेवट झाला. मालदा जिल्ह्यातील या घटनेत नेमकं काय घडलं, जाणून घ्या सविस्तर.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

दीराचे वहिनीसोबत अनैतिक संबंध

point

शेवटी पलंगाखाली आढळला मृतदेह

point

काय घडलं?

Crime News : नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. एका पतीने आपल्या अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या 24 वर्षीय पत्नीची गळा चिरून निघृण हत्या केली. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पतीने पत्नीचा मृतदेह घरातील खाटेखाली लपवून ठेवला होता. या प्रकरणी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत मुख्य आरोपी पती मोझम्मेल आणि त्याची प्रेयसी या दोघांनाही हत्येच्या व गुन्हेगारी कटाच्या आरोपाखाली अटक केली. पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील ही घटना आहे.

वहिनीशी अनैतिक संबंध

शीला बीबी असे या दुर्दैवी मृत महिलेचे नाव आहे. आठ वर्षांपूर्वी तिचा विवाह मोझम्मेल नावाच्या तरुणाशी झाला होता. मोझम्मेल हा व्यवसायाने मजूर असून तो इतर राज्यांमध्ये जाऊन मजुरीचे काम करत असे. या दांपत्याला दोन लहान मुलेही आहेत. पोलीस आणि स्थानिक उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून मोझम्मेलचे त्याच्याच कुटुंबातील एका महिलेशी (त्याच्या नात्याने लागणाऱ्या वहिनीसोबत) अनैतिक प्रेमसंबंध सुरू होते. या संबंधांची माहिती शीला बीबीला लागली होती.

हे ही वाचा : इंस्टाग्रामवर महिलेच्या नावाचं खोटं अकाउंट बनवलं, पतीला अश्लील व्हिडिओ पाठवले

बायकोचा विरोध अन् हत्या

नवऱ्याच्या या अनैतिक संबंधांमुळे घरातील वातावरण बिघडले होते आणि दररोज वाद निर्माण होत होते. शीला या अनैतिक नात्याला विरोध करत होती. घटनेच्या दिवशीही याच कारणावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले, ज्याच्या रागात मोझम्मेलने धारदार शस्त्राने शीलाचा गळा चिरला, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर संशय येऊ नये म्हणून मोझम्मेलने अतिशय हुशारीने पत्नीचा मृतदेह घरातील पलंगाखाली लपवून ठेवला.

हे ही वाचा : Govt Jobs : युको बँकेत नोकरीची संधी, 60 हजारांहून अधिक पगार; लगेच करा अर्ज

'असं' बाहेर आलं प्रकरण

घराभोवती राहणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांना त्याच्या संशयास्पद हालचालींवर संशय आला. त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता, पलंगाखाली शीलाचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी मालदा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे.