महिलेचा परपुरुषावर जीव जडला, दारु पिऊन मारहाण करणाऱ्या पतीला गळा आवळून संपवलं

मुंबई तक

31 Aug 2026 (अपडेटेड: 31 Aug 2026, 12:44 PM)

Crime News : बुलंदशहरमध्ये पत्नीने पतीची गमछाने गळा आवळून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधांचा विरोध आणि पतीकडून होणाऱ्या मारहाणीच्या आरोपांनंतर पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे.

Crime News Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पत्नीचा परपुरुषावर जीव जडला,

point

दारु पिऊन मारहाण करणाऱ्या पतीला गळा आवळून संपवलं

UP Crime News : उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील बहलीमपुरा गावात पत्नीने पतीची गमछाने गळा आवळून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्रीती असे आरोपी पत्नीचे नाव असून कृष्ण कुमार असे मृत पतीचे नाव आहे. अनैतिक संबंधांना विरोध आणि दारू पिऊन पतीकडून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून प्रीतीने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. घटनेच्या वेळी या दाम्पत्याची आठ वर्षांची मुलगी घरातच उपस्थित होती. पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली असून हत्येसाठी वापरण्यात आलेला गमछाही जप्त केला आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : Personal Finance: तुमच्या नावावर कुठे-कुठे आहे पैसा? एका दिवसात 'असा' शोधा सगळा पैसा!

नवऱ्याचा गळ्यावर संशयास्पद खुणा, अन् नातेवाईकांचा संशय वाढला 

घटनेनंतर प्रीती नातेवाईक येण्यापूर्वीच कृष्ण कुमार यांच्या अंत्यसंस्काराची तयारी करत होती. मात्र, नातेवाईक घरी पोहोचल्यानंतर त्यांनी कृष्ण कुमार यांच्या गळ्यावर संशयास्पद खुणा पाहिल्या. त्यांना संशय आल्याने त्यांनी तत्काळ डायल-112 वर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि कृष्ण कुमार यांचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. नातेवाईकांना संशय आल्यामुळे या घटनेचा खुलासा झाल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : कोथरुडच्या कुलकर्णी आणि पेठेतले बापट, ध्वनी प्रदुषणावर बेधडक चर्चा VIDEO

प्रियकरासोबत पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे आरोप

मृताची आई अंगूरी देवी आणि बहिणीने प्रीतीवर गंभीर आरोप केले आहेत. प्रीतीचे अन्य एका व्यक्तीसोबत अवैध संबंध होते आणि ती त्या व्यक्तीसोबत फोनवर सातत्याने बोलत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. कृष्ण कुमार यांचा या संबंधांना विरोध होता. याशिवाय प्रीती तिच्या प्रियकरासोबत पळून जाण्याच्या आणि संपत्ती विकण्याच्या तयारीत असल्याचाही कुटुंबीयांचा दावा आहे. कुटुंबात तीन एकर जमीन, घर आणि सुमारे 35 लाख रुपयांच्या प्लॉटच्या विक्रीवरूनही वाद सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

पोलीस अधिकारी प्रखर पांडेय यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान प्रीतीने पती दारू पिऊन घरी आल्यानंतर वारंवार मारहाण करत असल्याचे सांगितले. या त्रासाला कंटाळून तिने गमछाने कृष्ण कुमार यांचा गळा आवळल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेशी संबंधित मारहाणीचा एक जुना व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी हत्येत वापरलेला गमछा जप्त केला असून अनैतिक संबंधांच्या आरोपाच्या दिशेनेही तपास सुरू आहे. आरोपी प्रीतीला न्यायालयात हजर करण्यात आले असून तिला न्यायालयीन कोठडीत जेलमध्ये पाठवण्यात आले आहे.