संपदा मुंडेंनंतर फलटण उपजिल्हा रुग्णालयातील आणखी एका डॉक्टरची आत्महत्या
dr rajendra rupanwar suicide case : डॉ. संपदा मुंडे यांच्यानंतर फलटण उपजिल्हा रुग्णालयाशी संबंधित डॉ. राजेंद्र रूपनवर यांचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रशासकीय आणि राजकीय दबावाचे आरोप केल्यानंतर त्यांच्या मृत्यूने फलटण आरोग्य विभागाच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
संपदा मुंडेंनंतर फलटण उपजिल्हा रुग्णालयातील आणखी एका डॉक्टरची आत्महत्या
प्रशासकीय आणि राजकीय दबावाचे केले होते आरोप
dr rajendra rupanwar suicide case : फलटण उपजिल्हा रुग्णालयाशी संबंधित आणखी एका तरुण डॉक्टरच्या आत्महत्येने राज्यात पुन्हा खळबळ उडाली आहे. प्रशासकीय आणि राजकीय दबावाचा आरोप करत सातत्याने आपली व्यथा मांडणारे 27 वर्षीय वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र जगन्नाथ रूपनवर यांचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला. सायन परिसरात टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते अनेक दिवस मृत्यूशी झुंज देत होते. मात्र अखेर सोमवारी त्यांची झुंज अपयशी ठरली. या घटनेमुळे फलटणच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
हेही वाचा : 'शिदेंनी परभणीचा मेळावा रद्द केला होता, पळायला सुद्धा जागा राहिली नसती'
वरिष्ठांकडून कथित त्रास आणि प्रशासकीय दबावाचे आरोप
विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी याच फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यूने राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. आता त्याच रुग्णालयाशी संबंधित आणखी एका डॉक्टरचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. डॉ. रूपनवर यांनी आपल्या पत्रांमधून तसेच सोशल मीडिया पोस्टमधून वरिष्ठांकडून कथित त्रास आणि प्रशासकीय दबाव असल्याचे आरोप केले होते. तसेच वैद्यकीय आणि फिटनेस प्रमाणपत्रांबाबत राजकीय व्यक्ती आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून दबाव टाकला जात असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
हेही वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला पंतप्रधानांचा फोटो, अमित ठाकरेंनी काय केलं?
