Crime News : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका महिलेच्या हत्या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केल्याचा दावा केला आहे. 20 ऑगस्ट रोजी सरधना परिसरातील एका शेतात महिलेचा मृतदेह आढळला होता. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब होती. महिलेच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापतीच्या खुणा होत्या. चेहऱ्यावर विटेने अनेक वेळा वार करण्यात आल्याने मृतदेहाची ओळख पटवणे कठीण झाले होते. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर मृत महिलेची ओळख भावनपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील सयाल गावातील शीबा अशी पटली. 21 ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याचे फोटो पाहिल्यानंतर शीबाचे कुटुंबीय सरधना पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यानंतर शवागारात मृतदेहाची ओळख शीबा म्हणून करण्यात आली.
ADVERTISEMENT
हेही वाचा : भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेचा मृत्यू, पण घरात 30 लाखांची रोकड, नेमकं प्रकरण काय?
आधीच पाच मुली, मुलगा हवा म्हणून गर्लफ्रेंडसोबत संबंध
पोलिसांच्या माहितीनुसार, शीबाचा विवाह 2019 मध्ये कंकरखेडा पोलीस ठाणे क्षेत्रातील लाला मोहम्मदपूर येथील शाहरुखसोबत झाला होता. त्यांना दोन मुले होती. शाहरुख गाझियाबाद येथील एका कारखान्यात मजुरी करत होता. याच काळात शीबाची सादिकसोबत जवळीक वाढली आणि ती सादिकसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. सादिक आधीपासून विवाहित होता आणि त्याला पहिल्या पत्नी आशियापासून पाच मुली होत्या. पोलिसांच्या तपासानुसार, सुरुवातीला सादिकच्या कुटुंबीयांनी शीबाला सोबत ठेवण्यास विरोध केला. त्यानंतर सादिक काही काळ कुटुंबापासून वेगळा राहू लागला. काही दिवसांनी तो पुन्हा कुटुंबाकडे परतला आणि त्याला मुलगा नसल्याने मुलाच्या इच्छेने त्याने शीबाला सोबत ठेवल्याचे कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर सादिकच्या कुटुंबीयांनी शीबाला स्वीकारल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सुमारे एक वर्षापूर्वी शीबाने एका मुलाला जन्म दिला.
हेही वाचा : 13 वर्षांपूर्वी मृत घोषित केलेला आरोपी जिवंत सापडला; न्यायालयाने तुरुंगात पाठवलं
मुलाच्या जन्मानंतर गर्लफ्रेंडच्या हत्येचा प्लान
पोलिसांच्या तपासानुसार, मुलाच्या जन्मानंतर सादिक आणि त्याच्या कुटुंबीयांनी शीबाला मार्गातून हटवण्याची योजना आखल्याचा आरोप आहे. या कटात सादिकसोबत त्याची पहिली पत्नी आशिया, आई वसीरा आणि दोन्ही भाऊ आबिद व शादाब सहभागी असल्याचा पोलिसांचा दावा आहे. शीबाच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून सादिक, आशिया, वसीरा, आबिद आणि शादाब यांच्याविरोधात हत्या प्रकरण दाखल करण्यात आले आहे. पोलिसांच्या चौकशीत 19 ऑगस्ट रोजी शीबाला देहरादूनला फिरायला जाण्याच्या बहाण्याने गाडीत बसवण्यात आल्याचे समोर आले. पोलिसांच्या माहितीनुसार, गाडीतच सादिकने शीबाची हत्या केली. त्यानंतर मृतदेह मेरठच्या सरधना रोडवरील एका शेतात फेकण्यात आला. ओळख लपवण्यासाठी तिच्या चेहऱ्यावर विटेने अनेक वेळा वार करण्यात आल्याचा आरोप आहे. शीबाने 19 ऑगस्ट रोजी कुटुंबीयांना फोन करून सादिक आणि त्याचे कुटुंबीय तिला गाडीत बसवून घेऊन जात असल्याचे सांगितले होते. त्यानंतर तिचा फोन बंद झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शीबाचा मृत्यू गळा दाबल्याने झाला. चेहऱ्यावर विटेने वार करण्यात आले होते. शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील तथ्य समोर येऊ शकतात. सध्या पोलिस आरोपींविरोधात पुढील कारवाईची तयारी करत आहेत.
ADVERTISEMENT












