दोघेही OYO मध्ये असायचे, तरुणी 'त्याला' सतत बोलवायची, पण 'त्या' रात्री...

Crime news : एक तरुण नेहमी तरुणीला भेटण्यासाठी जायचा. एक दिवस तरुणीने त्याला ठरलेल्या ठिकाणी भेटायला बोलावले असता, तरुण भेटण्याच्या उद्देशाने घटनास्थळी पोहोचला. तेव्हा तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

crime news

crime news

मुंबई तक

• 08:28 PM • 24 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

भावाच्या शरीरावर अनेक चाकूच्या जखमा

point

नेमकं 'त्या' रात्री काय घडलं? 

Crime news : एक तरुण नेहमी तरुणीला भेटण्यासाठी जायचा. एक दिवस तरुणीने त्याला ठरलेल्या ठिकाणी भेटायला बोलावले असता, तरुण भेटण्याच्या उद्देशाने घटनास्थळी पोहोचला. तेव्हा तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मृत तरुणाचे नाव मारुफ (वय 27)असे आहे. मृत तरुण हा उत्तर प्रदेशातील कोसिकल येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : फलटणमधील डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, आतेभावाने फोडलं बिंग, घटनेचे धागेदोरे बड्या नेत्याशी?

नेमकं 'त्या' रात्री काय घडलं? 

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मारुफ हा गुरुवारी दुपारी 4 वाजता त्याच्या घरातून फरिदाबाद आला होता. त्याच्यासोबत कोसी येथील रहिवासी इमलक होता, दोघेही रात्री 9 वाजेपर्यंत एकत्र राहिले. इमलक टॅक्सी चालक म्हणून काम करत आहे, तसेच मारुफ मजूर म्हणून काम करतो. 

संबंधित प्रकरणात मृताचा भाऊ समीर म्हणतो की, सिम्मी नावाच्या तरुणीने त्याच्या भावाला फोन करून ओयो हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर त्याने पुढे दावा केला की,ओयो हॉटलमध्ये दोघेही राहत असे. गेल्या अनेक महिन्यांपासून बैठका सुरु झाल्या होत्या. समीरने असेही सांगितलं की, इमलकने पोलिसांना सांगितलं की, तो त्याच्या भावाला रात्री 9 वाजता फरिदाबाद येथे सोडून दिल्लीला गेला. शुक्रवारी फरिदाबादच्या सेक्टर 19 च्या हद्दीत पोलिसांनी भावाचा अपघात झाल्याबाबतची माहिती दिली होती. 

भावाच्या शरीरावर अनेक चाकूच्या जखमा

मृताच्या भावाचे म्हणणं आहे की, त्याचा भाऊ हा कामगार होता आणि त्याला दारूचं व्यसन होतं. समीरने सांगितलं की, त्याच्या भावाच्या शरीरावर अनेक चाकूच्या जखमा आढळल्या होत्या. समीरच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. समीरने सांगितलं की, त्याच्या भावाची हत्या करणारे नेमकं कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, याचं उत्तर शोधण्याचं काम सुरु आहे. 

हे ही वाचा : जालना हादरलं! भररस्त्यात उद्योगपतीवर 'त्या' रात्री प्राणघातक हल्ला, रोहित पवारांनी 'x' ट्विटमधून घेतला समाचार

पोलिसांनी घटनास्थळाभोवती असलेले सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन केलेत. त्याच ठिकाणी एक ओयो हॉटेल देखील असल्याचं सांगण्यात येत आहे. याच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या तपासातून नेमकी कोणती माहिती समोर येईल हे बघणं गरजेचं असेल. 

    follow whatsapp