जालना हादरलं! भररस्त्यात उद्योगपतीवर 'त्या' रात्री प्राणघातक हल्ला, रोहित पवारांनी 'x' ट्विटमधून घेतला समाचार

मुंबई तक

jalna crime : जालना शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रसिद्ध उद्योगपती नरेंद्र मित्तल यांच्या पुतण्यावर एक दोन नाही,तर तब्बल सात ते आठ जणांनी प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सध्या समोर आला आहे.

ADVERTISEMENT

jalna crime
jalna crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जालना शहरात एक धक्कादायक प्रकार

point

उद्योगपतीवर भररस्त्यावर प्राणघातक हल्ला

Jalna Crime : जालना शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रसिद्ध उद्योगपती नरेंद्र मित्तल यांच्या पुतण्यावर एक दोन नाही,तर तब्बल सात ते आठ जणांनी प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार आहे. आरोपीने दुचाकींने पाठलाग करत मित्तल यांच्या पुतण्याची कार अडवली. त्यानंतर त्यांना कारमधून बाहेर काढत बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीचा एकूण प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनं जालना शहर हादरून गेलं आहे. 

हे ही वाचा : 'अबकी बार मोदी सरकार', घोषणेचे निर्माते पियुष पांडे यांचं निधन, जाहिरात क्षेत्रातील बाप माणूस हरपला

एकूण घडलेला प्रकार 

उद्योगपती मित्तल यांच्या पुतण्यावर हल्ला झाला असून  यश मित्तल असे त्यांचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळी पाडव्याच्याच दिवशी रात्री मित्तल हे गुजरात पासिंगचा नंबर असलेल्या वाहनातून पत्नीसह घीर परतत होते. तेव्हा दुचाकीवरून आलेल्या सात ते आठ गुंडांनी मिळून गाडीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी यश मित्तल यांना अडवले आणि त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. तेव्हा गुंडांनी तात्काळ घटनास्थळावरून धाव घेतली. 

या झालेल्या हल्ल्यात यश मित्तल गंभीर जखमी झाले असता, त्यांना छत्रपती संभाजीनगरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यांच्यावर सध्या आयसीयुत उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहेत. या एकूणच घटनेनंतर राष्ट्रावादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. 

रोहित पवारांचं ट्विट जसंच्या तसं

एकेकाळी कायदा व सुव्यवस्थेसाठी पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आता भ्रष्टाचारात आणि बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेत पहिल्या क्रमांकावर गेल्याचं राज्यात वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांवरून सिद्ध होतं. जालन्यामध्ये प्रसिद्ध उद्योगपती नरेंद्र मित्तल यांच्या पुतण्यावर ऐन दिवाळीत कसा जीवघेणा हल्ला करण्यात आला याचं हे फुटेज बघा... या गाडीतील महिला जिवाच्या आकांताने ओरडत असताना गुंड मात्र जीवघेणा हल्ला करत होते आणि याला पूर्णतः हे अकार्यक्षम सरकार आणि गृहमंत्रालय जबाबदार आहे. राज्यातील जनतेने आणखी किती दिवस जीव मुठीत धरून जगायचं? 

हे वाचलं का?

    follow whatsapp