शरीरसंबंधांचे व्हिडिओ बनवण्याची पतीची पत्नीकडे मागणी, पत्नीनं दिला नकार अन् सकाळी उठताच..

मुंबई तक

28 Jun 2025 (अपडेटेड: 28 Jun 2025, 07:52 PM)

crime news : मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील उमरी ठाणे परिसरात पुलेह गावात धक्कादायक घटना घडली आहे. नवविवाहित पतीने आपल्या पत्नीला लग्नाच्या काही दिवसांनंतर लैंगिक संबंधाचे व्हिडिओ बनवण्याचा हट्ट धरला.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पतीने लैंगिक संबंधाचे व्हिडिओ बनवण्याचा धरला हट्ट

point

पत्नीने नकार दिल्यानंतर केली पतीने केली हत्या

Crime news : मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील उमरी ठाणे परिसरात पुलेह गावात धक्कादायक घटना घडली. नवविवाहित पतीने आपल्या पत्नीकडे लग्नाच्या काही महिन्यानंतर लैंगिक संबंधांचे व्हिडिओ बनवण्याचा हट्ट धरला. पण त्याच्या पत्नीने अशा कृत्यास नकार दिला होता. जबर सिंग असे नवविवाहित पतीचे नाव आहे. पत्नीने अशा फॅन्टसिला विरोध केल्यानंतर पतीने गोल्डीची हत्या केली आहे. त्यानंतर तो आपल्याच पत्नीच्या मृतदेहाच्या शेजारी झोपला. सकाळी उठताच त्याने घडलेलं सर्व प्रकरण कुटुंबियांना सांगितलं. त्यानंतर तो स्वत:च पोलिसांना सरेंडर झाला. 

हे वाचलं का?

हेही वाचा : एकाच वेळी दोन मुलींकडून ऑफर, तरूण हॉटेलमध्ये पोहचला अन् सुरू झाला घाणेरडा खेळ!

सविस्तर वृत्त 

घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणात पोलिसांनी माहिती दिली की, आरोपींविरोधात हत्येच्या कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत. मृत वडील बिरबर जाटव आणि भाऊ जितेंद्र जाटव यांनी पती आणि सासरे भरत यांच्यावर हत्या केल्याचा आरोप केला आहे.  दरम्यान मृताच्या बोटाला जखम झाली होती आणि चेहऱ्यावर बऱ्याच जखमा झाल्या होत्या. 

या प्रकरणात आता डीएसपी दीपक तोमरने सांगितलं की, या प्रकरणात मोठा तपास केला जात आहे. कुटुंबियांच्या तक्रारीवरून अन्य आरोपींचा खोलवर तपास केला जात आहे. याप्रकरणात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

दरम्यान, सकाळी बेडरूमचा दरवाजा खोलण्यात आला असता, बेडरुममध्ये सूनेचा मृतदेह पाहून कुटुंबियांच्या अंगावर शहारे आले. सून रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. गेली चार महिने सुखाच्या संसारात मिठाचा खडा पडल्याने संसारात खारटपणा आला. 

हेही वाचा : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बड्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग, लॉजवरील अश्लील व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती एका वृत्त माध्यमाने दिली. शवविच्छेदनानंतर हत्येची एकूण माहिती समोर येईल. जसे की, पीडित महिलेला कोणत्या वस्तुने मारहाण केली आहे. तिच्या चेहऱ्यावर झालेल्या जखमांची एकूण महत्त्वाची माहिती अहवालातून समोर येवू शकते.