सासूचं आणि जावयाचं होतं लफडं, संबंध ठेवल्याचे व्हिडिओही बनवले, नंतर पत्नीसह तिच्या आईने नको तेच...

crime news : पत्नीने आपल्या आईला हाताशी घेऊन आपल्याच नवऱ्याला संपवलं, हत्येमागचं खरं कारण समोर आलं.

crime news

crime news

मुंबई तक

15 Oct 2025 (अपडेटेड: 15 Oct 2025, 08:56 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पत्नीने आपल्या आईला हाताशी धरत पतीला संपवलं

point

धक्कादायक कारण समोर आलं

Crime News : एका पत्नीने आपल्या आईच्या मदतीने स्वत:च्याय पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर गुन्हा दाखल करत आत्महत्या करून मृतदेह जाळण्यात आला होता. तरुण हा आपल्या पत्नीसह सासूसोबत एकाच घरात राहत होता. पत्नीने आपल्या आईच्याच नावावर मालमत्ता करून घेतली होती. सांगण्यात येते की, याच काळात सासू आणि जावयाचे संबंध निर्माण झाले होते. पत्नीकडे यासंबंधित व्हिडिओ देखील होते. याच मालमत्तेवरून मोठा वाद उफळला, त्यानंतर सोनूने व्हिडिओचा वापर करत सासूला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. परिणामी त्याच्या पत्नीने आणि सासूने तरुणाला संपवण्याचा कट रचला. दरम्यान, या प्रकरणातील सासूचे नाव हे सरोज तर पत्नीचं नाव सोनिया आणि तरुणाचे नाव सोनू असे आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी ज्या घरात राहत होती त्याच नराधमाने... डोंबिवलीतील मुलीनं धाडस करत डोकं लावलं अन्...

काय घडलं? 

सोनियाला या प्रकरणात जेव्हा संशय आला तेव्हा तिने अश्रू ढाळत सोनूचा भाऊ मोनूला सांगितले की, तिचा भाऊ सोनूला कुठेतरी घेऊन गेला. तेव्हा तिने यावर कसलीही स्पष्टोक्ती दिली नाही. त्यानंतर मोनूला सोनियाबाबत संशयाची पाल मनात चुकचुकली होती. त्यानंतर पोलिसांनी सोनिया आणि तिची आई सरोज यांची कसून चौकशी केली. तेव्हा पोलिसांनी दावा केला की, दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला आणि त्यामुळेच त्यांना अटक करण्यात आली होती. सोनियाने तिच्या आईसोबत मिळून पतीची हत्या केली, यामागचं कराणंही धक्कादायक आहे. 

संबंधित घटना ही उत्तर प्रदेशातील बागपात येथील बिनौली पोलीस ठाणे परिसरात घडली होती. सोनू सैनीने सुमारे 15 वर्षांपूर्वी सोनियाशी विवाह केला होता. सोनिया व्यतिरिक्त, सोनूची आई सरोज ही देखील सोनूच्याच घरी राहत होती. त्याच काळात सरोज आणि सोनू यांच्या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. या घटनेचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला गेला. मृत सोनूने बिजनौरमध्ये त्याची सासू सरोजच्या नावावर एक जमीन देखील खरेदी केली होती, ज्याची किंमत आता अंदाजे 20 लाख असण्याची शक्यता आहे. सोनूला ती जमीन विकायची होती, परंतु सासू आणि पत्नीने विरोध केल्याचं बोललं जात होतं. 

जावयाने दाखवले सासूचे नको ते व्हिडिओ नंतर...

या संपत्तीच्या वादात सोनूने सासूला तिचे काही अश्लील व्हिडिओ दाखवले आणि ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तिने फ्लॅट विकण्यास नकार दिल्यास तिचे व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकीच दिली होती. सासू आणि मुलीने त्याला संपवण्याचा कट आखला आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. 

हे ही वाचा : जालना जिल्ह्यातील पाझर तलावात दोघेही भाऊ पोहायला गेले, पाण्याचा अंदाज न आल्याने गटांगळ्या खात बुडून...

संबंधित प्रकरणात सोनूचा भाऊ मोनू सैनीला त्याची मेहुणी सोनियावर संशय आल्याने पोलिसात तक्रार दाखल केली. त्याने सांगितले की, सोनियाचा भाऊ तिला फोनद्वारे संपर्क करत निघून गेला होता. मोनूने तिला प्रश्न केला तेव्हा तिला काहीही सांगता आलं नाही. मोनूला आपल्याच मेहुणीवर संशय आला होता. त्याने पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. त्यानंतर दोघींनीही गुन्ह्याची कबुली दिली. 

    follow whatsapp