बॉयफ्रेंडसोबत दारुपार्टी अन् मौजमजा, 'त्या' कारणाने आत्याचा बळी, काय घडलं?

मुंबई तक

06 Aug 2026 (अपडेटेड: 06 Aug 2026, 02:17 PM)

Crime News : घरातील विश्वासाचा गैरफायदा घेत विवाहित पुतणीने प्रियकरासोबत मिळून सख्ख्या आत्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप समोर आला आहे. पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे दोन्ही आरोपींना अटक केली असून चोरीचा मुद्देमालही जप्त केला आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

बॉयफ्रेंडसोबत दारुपार्टी अन् मौजमजा

point

'त्या' कारणाने आत्याचा बळी, काय घडलं?

Crime News : राजस्थानमधील सांभर येथे एका कुटुंबातील विश्वासाचाच गैरफायदा घेत महिलेच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ज्या पुतणीवर घरातील सर्वजण विश्वास ठेवत होते, तिनेच आपल्या प्रियकरासोबत मिळून सख्ख्या आत्याच्या हत्येचे षड्यंत्र रचले. घरातील कपाट कुठे आहे, चावी कुठे ठेवली जाते, दागिने आणि रोख रक्कम कोणत्या ठिकाणी ठेवली जाते, याची संपूर्ण माहिती आरोपी पुतणीला होती. याच माहितीचा वापर करून दोघांनी ही संपूर्ण योजना आखल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : हिंगोलीत आयुष्य संपवलेल्या मुलाच्या आईची Abhijit Dipke यांच्याकडून काय अपेक्षा?

ही घटना 30 जुलै रोजी घडली. सांभरमधील तेज्या का बास परिसरात राहणारे प्रकाश नारायण शर्मा यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली की, त्यांच्या सासू कमला देवी यांची हत्या करण्यात आली असून घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली आहे. सुरुवातीला ही घटना लुटीनंतर झालेल्या हत्येची असल्याचे वाटत होते. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, तांत्रिक पुरावे गोळा केले तसेच सायबर सेलची मदत घेत तपास सुरू केला. तपासाची दिशा हळूहळू मृत महिलेची पुतणी ललिता हिच्याकडे वळली.

हेही वाचा : मुंबईची खबर : शासकीय रुग्णालयांतील डॉक्टर्सचे आंदोलन, 'या' सेवा आजपासून बंद

प्रियकरासोबत मौजमजा आणि मद्यपानासाठी चोरी.. 

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चौकशीदरम्यान ललिताने आपला गुन्हा कबूल केला. तिच्या सांगण्यावरून तिचा कथित प्रियकर बबलू मीणा यालाही अटक करण्यात आली. दोघांकडून दोन सोन्याच्या बांगड्या, सोन्याचे टॉप्स, नथ, चांदीची पैंजण, चांदीची नाणी, रोख रक्कम, एटीएम कार्ड, आधार कार्ड तसेच चोरीतील इतर साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, ललिता विवाहित असून प्रियकरासोबत मौजमजा आणि मद्यपानासाठी पैशांची व्यवस्था करण्याच्या उद्देशाने दोघांनी आधी घराची रेकी केली. घरातील प्रत्येक गोष्टीची माहिती असल्याने त्यांनी त्याचाच वापर करून संपूर्ण कट रचल्याचा आरोप आहे.

चौकशीदरम्यान ललिताने दिली गुन्ह्याची कबुली 

घटना घडल्यानंतर दोन्ही आरोपी दागिने आणि रोख रक्कम घेऊन फरार झाले. ही घटना सामान्य लुटीप्रमाणे नोंद होईल आणि संशय बाहेरील व्यक्तींवर जाईल, असा त्यांचा अंदाज असावा. मात्र मोबाईल लोकेशन, डिजिटल ट्रेल आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला. सांभरलेक पोलीस ठाण्याचे प्रभारी राममिलन मीणा यांनी सांगितले की, 30 जुलै रोजी प्रकाश नारायण शर्मा यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सखोल तपास करण्यात आला. चौकशीदरम्यान ललिताने गुन्ह्याची कबुली दिली आणि तिच्या माहितीच्या आधारे बबलू मीणा यालाही अटक करण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्रियकरासोबत मौजमजेसाठी पैशांची व्यवस्था करण्याच्या उद्देशाने दोघांनी हा कट रचल्याचा आरोप आहे.