Crime news : उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्हा कारागृहातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एचआयव्हीची चाचणी केल्यानंतर एक दोन नाहीतर तब्बल 13 ट्रान्सजेंडरपैकी सात जणांना एचआयव्हीची बाधा झाल्याचं आढळून आलं. यापैकी एक पुरुष असल्याचं सांगण्याच येत आहे. यामुळे तुरुंग प्रशासन आणि आरोग्य विभागाला मोठा धक्का बसला आहे. परिस्थिती पाहता तुरुंगात सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब सध्या देशात चिंतेचा विषय ठरत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : KDMC: राज ठाकरेंच्या मनसेने पुन्हा बदलली भूमिका?, ज्यांच्या विरुद्ध लढले त्यांच्यासोबतच गेले सत्तेत...
ट्रान्सजेंडर समुदायात दोन गटांमध्ये वाद
ही घटना कोतवाली परिसरातील अचलपूर येथे घडली आहे. रविवारी ट्रान्सजेंडर मिस्बा आणि अंजली या दोन गटांमध्ये मोठा राडा झाला होता. त्यांच्या वादाला हिंसक वळण प्राप्त झाल्याचं चित्र दिसून आलं. पोलिसांनी कडक कारवाई करत दोन्ही बाजूंच्या 13 जणांविरोधात एफआरआय दाखल करण्यात आला होता. तुरुंगाच्या नियमावलीनुसार आरोपींची तपासणी केली जाणार असता, रिपोर्ट लवकरच येण्याची शक्यता वर्तवली आहे. या घटनेची माहिती देशभरात पसरली आहे.
ट्रान्सजेंडर लोकांमध्ये एचआयव्हीची बाधा
दरम्यान, प्राथमिक तपासातून सात ट्रान्सजेंडर लोकांमध्ये एचआयव्हीची बाधा झाल्याचं आढळून आल्याची वस्तुस्थिती आहे. रक्ताचे सर्व नमुने देखील प्रयोगशाळेत तपासणीस पाठवले गेले होते. सध्या, सर्व बाधीत रुग्णांना इतर कैद्यांपासून वेगळं ठेवण्यात आलं. तर दुसरीकडे इतर कैद्यांना आयसोलेशन बॅरेकेटमध्ये हलवले आले होते.
हे ही वाचा : केडीएमसी महापालिकेत ट्वीस्ट! मनसेचा शिवसेनेला पाठिंबा, बंद दाराआड राजकीय खलबतं
13 पैकी एक व्यक्ती पुरुष
यामध्ये 13 पैकी 12 हे ट्रान्सजेंडर असून एक व्यक्ती हा पुरुष असल्याने पुरुष देखील षंढ म्हणून काम करतात का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. स्थानिकांचा असा विश्वास आहे की, जास्त कमाईच्या आमिषामुळे अनेक तरुण देखील तृतीयपंथियांच्या समुदायात सामील होताना दिसत आहेत.
ADVERTISEMENT











