Crime News : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील विकल्प खंडात एका हॉस्पिटलमध्ये एका कर्मचाऱ्यावर गोळीबार करत हत्या करण्यात आली. या घटनेनंतर लखनऊ हादरून गेलं आहे. या घटनेमुळे लखनऊ शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे. रात्री उशिरा झालेल्या वादानंतर हॉटेलमध्ये तरुणावर गोळीबार करण्यात आला. गोळीबारात तरुण गंभीर जखमी झाल्यानंतर पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र, तोवर तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : कॉलेजला सोडण्याच्या बहाण्याने विद्यार्थीनीला नेलं घरी, नंतर केलं लैंगिक शोषण, जर कोणाला सांगितलं तर....दिली धमकी
नेमकं काय घडलं?
बाराबांकी येथील रहिवासी असलेले देवेंद्र मिश्रा हे विकल्प खंड येथील इन हॉटेलचे मालक आहेत. सुलतानपूर येथील रहिवासी असलेल्या दिवाकर यादव ( वय20) याच हॉटेलमध्ये काम करायचा. संबंधित प्रकरणात देवेंद्र मिश्रा यांनी सांगितलं की, गोरखपूर येथील एक मुलगी हॉटेलमध्ये राहत होती. रात्री 12.30 वाजताच्या दरम्यान तरुण तिला घेण्यासाठी हॉटेलजवळ गेला होता. त्या तरुणाचा दिवाकरशी शुल्लक कारणावरून वादंग निर्माण झाला. त्यानंतर तरुण मुलीला हॉटेलमधून घेऊन गेला होता.
दिवाकर गंभीर अवस्थेत लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. देवेंद्र मिश्राने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तिथं उपस्थितांपैकी असणाऱ्या उदय सेन यादव यांनी सांगितलं की, सोमवारी रात्री उशीरा 12 वाजून 30 मिनिटांनी एक तरुणी हॉटेलमधून फोनवरून बोलत बाहेर आली होती. दरम्यान, तिला घेण्यासाठी आलेल्या मुलीच्या कथित बॉयफ्रेडनं अचानकपणे गोळीबार केला असता, थेट गोळी दिवाकरच्या मानेवर लागली.
हेही वाचा : काकानेच पुतण्यांवर चाकूने केले सपासप वार, एक गंभीर जखमी तर एकाचा जागीच मृत्यू, हादरून टाकणारी घटना
संबंधित प्रकरणात तपास केला असता खोलीतून कंडोमचं पाकीट सापडलं आणि दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. गोळीबारानंतर आरोपी हा आकाश तिवारी असल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
