दारूच्या नशेत तरुण, कुऱ्हाडीने हल्ला करत वडिलांची निर्घृण हत्या

Crime News : वडिलांनी दारू पिण्यावरून आपल्या पोटच्या मुलाला टोकल्याने मुलानेच दारूच्या नशेत वडिलांची निर्घृणपणे हत्या केली. आरोपी रात्री उशिराने दारूच्या नशेत घरी परतला होता. वडिलांनी त्याला दारू पिण्यावरून जाब विचारल्याने तो संतापला. वडिलांच्या ओरडण्याने संतप्त झालेल्या आरोपीने कुऱ्हाडीने हल्ला करत वडिलांची हत्या केली.

Mumbai Tak

मुंबई तक

29 Jun 2026 (अपडेटेड: 29 Jun 2026, 03:18 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

लेकाकडून कुऱ्हाडीने वडिलांची हत्या 

point

पत्नी देखील माहेरी गेली

Crime News : वडिलांनी दारू पिण्यावरून आपल्या पोटच्या मुलाला टोकल्याने मुलानेच दारूच्या नशेत वडिलांची निर्घृणपणे हत्या केली. आरोपी रात्री उशिराने दारूच्या नशेत घरी परतला होता. वडिलांनी त्याला दारू पिण्यावरून जाब विचारल्याने तो संतापला. वडिलांच्या ओरडण्याने संतप्त झालेल्या आरोपीने कुऱ्हाडीने हल्ला करत वडिलांची हत्या केली. ग्रामस्थांनी आरोपीला ताब्यात घेतलं आणि पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत. हा धक्कादायक प्रकार झारखंडच्या बाकोरा जिल्ह्यात घडला असून परिसर हादरून गेला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : शनीची वक्री गती आणि गुरूचा अस्त एकत्र, 'या' राशी अडचणीत येतील

लेकाकडून कुऱ्हाडीने वडिलांची हत्या 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाकोरा जिल्ह्यातील तरुण हा दारूच्या नशेत होता. तेव्हा लेकानं कुऱ्हाडीने हल्ला करत वडिलांची हत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री जोगेश्वरी विहार ठाणे परिसरातील तिलैया पंचायत अंतर्गत करीपानी गावातील आहे. जागेश्वर विहर ठाणे प्रभारी प्रकाश यादवने सांगितलं की, तिचा नवरा, जैलाल करमाळीने दारू प्यायल्याने त्याच्यावर आरडाओरड केली. याचाच राग मनात ठेवून अर्जुनने कुऱ्हाडीने वडिलांवर हल्ला केला. ज्यात वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता, अशातच अर्जुन न्यायिक हा पोलिसांच्या ताब्यात आहे. 

पत्नी देखील माहेरी गेली

पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, जैलाल करमाळीने आपल्या मुलाला दारू पिण्यास विरोध केला होता. त्यांनी सांगितलं की, कुटुंबात सतत वाद होतो. दारूच्या नशेत त्याने पत्नीला मारहाण देखील केली होती, याच रागातून पत्नी माहेरी गेली होती. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, वडिलांचं बोलणं ऐकून अर्जुनला राग अनावर झाला. यानंतर त्यांच्यात मोठा वाद झाला, याच वादातून रागाच्याभरात घरात ठेवलेली कुऱ्हाड उचलली आणि वडिलांच्या डोक्यात प्राणघातक हल्ला केला, ज्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

हे ही वाचा : सरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा, पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय

घडलेल्या घटनेच्या माहितीनुसार, ग्रामस्थांनी आरोपीला ताब्यात घेतलं आणि पोलिसांनी सूचना देण्याआधी त्याला घरातच बांधून ठेवला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर आरोपीला अटक केली. पोलिसांनी मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यासाठी कायद्याचं पालन केलं.  हत्येसाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड जप्त देखील करण्यात आली आहे.