Crime News : एक धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. वडिलांची सरकारी नोकरी अनुकंपा तत्त्वावर मिळावी यासाठी मुलाने सुपारी देऊन वडिलांची हत्या केली. मृत वडिलांचे नाव तुलेश्वर नोनिया असे असून ते भारत कोकिंग कोल लिमिटेड' (BCCL) चे कर्मचारी होते. 19 जून रोजी त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली असून माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो, याची ही हृदयद्रावक कहाणी झारखंडच्या धनबाद जिल्ह्यातून समोर आली आहे.
ADVERTISEMENT
10 लाखांची सुपारी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी मृत तुलेश्वर यांचा मुलगा विजय चौहान आणि त्याने नेमलेले दोन भाडोत्री मारेकरी अमित सिंग आणि अखिलेश मल्लाह यांना अटक केली आहे. मृत तुलेश्वर नोनिया हे बरोरा येथील बीसीसीएलच्या कोळसा खाणीत कार्यरत होते आणि त्यांच्या निवृत्तीला अवघे दोन वर्षे शिल्लक राहिले होते. वडिलांच्या निधनानंतर खाणीत कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळावी या हव्यासापोटी विजयने आपल्याच वडिलांना वाटेतून हटवण्याचा कट रचला. यासाठी त्याने दोघांना 10 लाखाची सुपारी दिली.
हे ही वाचा : TET पेपर लीक प्रकरण : तिघांना अटक, मुख्य आरोपी फरार, 1.5 कोटींचा रेट
'अशी' होती योजना
स्वतःला यापासून वाचवण्यासाठी विजयने आधीच प्लॅनिंग करुन ठेवलं होतं. औरंगाबादला (बिहार) नातेवाईकाच्या लग्नासाठी जात असल्याचे वडिलांना सांगून विजय घराबाहेर पडला. हत्येच्या वेळी आपण घटनास्थळी उपस्थित नव्हतो असे दाखवण्यासाठी विजयने हा प्लॅन केला होता. दुसरीकडे, योजनेनुसार शुक्रवारी 19 जूनच्या रात्री तुलेश्वर नोनिया यांची ड्युटी संपल्यानंतर अमित आणि अखिलेश यांनी त्यांना आपल्या मोटारसायकलवर लिफ्ट दिली आणि एका निर्जन स्थळी घेऊन गेले.
हे ही वाचा : आप नेत्या नंदानी यांचा मृतदेह आढळला, विवाहित बॉयफ्रेंडवर खून केल्याचा आरोप
तिघांना अटक
त्या निर्जन ठिकाणी दोन्ही मारेकऱ्यांनी एका मोठ्या दगडाने ठेचून तुलेश्वर नोनिया यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. पुरावा नष्ट करण्याच्या आणि त्यांची ओळख पटू नये या उद्देशाने आरोपींनी त्यांचे तोंड पूर्णपणे छिन्नविच्छिन्न केले. त्यानंतर ही घटना केवळ एक रस्ता अपघात आहे असे भासवण्यासाठी, त्यांनी मृतदेह ओढत आणून मुख्य रस्त्यावर फेकून दिला. पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे तपास करत या खोट्या अपघाताचा बनाव उघड केला आणि मुलासह तिघांना गजाआड केले.
ADVERTISEMENT











