शर्टमध्ये काहीतरी आहे म्हणून वर्गमैत्रिणीला बोलवलं अन् बाथरुमजवळ जाताच...

मुंबई तक

• 07:33 AM • 29 Jun 2026

तुझ्या कपड्यांमध्ये काहीतरी अडकले आहे, असे सांगून एका मुलीला बाथरुमजवळ बोलावले. यानंतर तिला खाली पाडून तिच्यावर वार करण्यात आले. गुजरातमधील तापी जिल्ह्यातील आश्रमशाळेतील या घटनेत नेमकं काय घडलं?

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

शर्टमध्ये काहीतरी आहे म्हणून वर्गमैत्रिणीला बोलवलं

point

अन् बाथरुमजवळ जाताच...

Crime News : एका आश्रमशाळेत नववीत शिकणाऱ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीवर तिच्याच वर्गमैत्रिणीने चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. गंभीर जखमी झालेल्या या विद्यार्थिनीला आधी येथील शासकीय रुग्णालयात आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी सुरतच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिच्यावर एक अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. गुजरातच्या तापी जिल्ह्यातील वालोड परिसरातील शाळेत ही घटना घडली.

हे वाचलं का?

बाथरुमजवळ जाताच...

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरील बाथरुमजवळ घडली. आरोपी विद्यार्थिनीने पीडितेच्या शर्टमध्ये काहीतरी अडकले आहे, असे सांगून तिला बहाण्याने बोलावून घेतले. पीडित मुलगी तिथे पोहोचताच आरोपीने तिची मान पकडून तिला जमिनीवर पाडले आणि स्वतःजवळ लपवून ठेवलेला चाकू काढून तिच्या हातावर सपासप वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे शाळेत एकच गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.

हे ही वाचा : चिमुरडीवर 39 मिनिटे अत्याचार, 18 जखमा; नसरापूर बलात्कार प्रकरणात कोर्टात काय घडलं?

चाकूचा खोल वार अन् अनेक तास शस्त्रक्रिया

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकूचा वार इतका खोल होता की पीडितेच्या हाताच्या 'रेडियल' आणि 'अल्नर' या दोन्ही मुख्य धमन्या कापल्या गेल्या होत्या. तसेच हाताच्या नसा आणि टेंडनचेही मोठे नुकसान झाले होते, ज्यामुळे प्रचंड रक्तस्त्राव झाला. सुरत येथील डॉक्टरांच्या पथकाने अनेक तास शस्त्रक्रिया करून या कापलेल्या धमन्या आणि नसा यशस्वीरित्या जोडल्या. मुलीच्या हाताला जवळपास 20 टाके पडले असून, सध्या तिचा रक्तप्रवाह सामान्य असला तरी तिला पूर्णपणे बरे होण्यासाठी काही वेळ लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले.

हे ही वाचा : केतन अग्रवाल हत्या प्रकरण, सियाचा प्रियकर चेतन चौधरी नेमका कोण आहे?

दोघींमध्ये मैत्रीवरुन वाद

पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार या दोन्ही विद्यार्थिनींमध्ये मैत्रीवरून काहीतरी वाद झाला होता. याच रागातून आरोपी मुलीने हे टोकाचे पाऊल उचलले. ही आरोपी मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्याविरुद्ध 'जुवेनाईल जस्टिस' (बाल न्याय) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जात आहे. तसेच तिच्याकडे चाकू कुठून आला, याचाही शोध पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे शाळांमधील मुलांमध्ये वाढणाऱ्या हिंसक प्रवृत्तीबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.