4 वर्षीय चिमुकलीवर 62 वर्षीय वृद्धाकडून लैंगिक शोषण अन्..

Crime News : एका गावात घराबाहेर खेळत असलेल्या एका चार वर्षीय मुलींचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता, लैंगिक अत्याचाराची पुष्टी झाली.

Crime News

Crime News

मुंबई तक

28 Jun 2026 (अपडेटेड: 28 Jun 2026, 03:57 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला

point

आरोपीच्या दोन्ही पायांत गोळीबार

Crime News : उत्तर प्रदेशातील बदाऊनच्या आलापूर पोलीस ठाणे परिसरात एका गावात घराबाहेर खेळत असलेल्या एका चार वर्षीय मुलींचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता, लैंगिक अत्याचाराची पुष्टी झाली. पोलिसांनी एका अज्ञात संशयितांविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा लज्ज्सास्पद प्रकार 26 जून रोजी घडला होता. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : "ऑपरेशन टायगर नाही, हे ऑपरेशन देवेंद्र.. पंतप्रधान पद", उद्धव ठाकरेंनी उडवून दिली मोठी खळबळ

पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला

याच प्रकरणात मुलीने आरोपीची पोलिसांना ओळख सांगितली, ओळखीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. रात्री उशिरापणे आरोपीने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना आलापूर-भसराला मार्गावर आढळून आला होता. पोलिसांनी संशयित मानून थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पेरूच्या बागेकडे धावला आणि त्याने गोळीबार केला. 

आरोपीच्या दोन्ही पायांत गोळीबार

त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला, आरोपीच्या दोन्ही पायांत गोळ्या घालून त्याला अटक करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच. दातागंजचे सीओ राहुल पांडे हे घटनास्थळी दाखल झाले. 

हे ही वाचा : एकतर्फी प्रेमप्रकरणातून तरुणानं 26 वर्षीय तरुणीचं घर जाळलं, पीडिता किंचाळू लागली..

नंतर आरोपीला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले, जिथे या घटनेची माहिती मिळताच, एसएसपी अंकिता शर्मा आणि एसपी सिटी अभिषेक कुमार सिंह घटनास्थळी दाखल झाले होते. पीडितेनं अंकिता शर्माला सांगितलं की, मुलीकडून मिळालेल्या माहितीनंतर आरोपीची ओळख पटली असून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.