'नवरा पॉर्न बघायला लावतो, मग अनैसर्गिक कृत्य करतो' महिलेनं सांगितली हादरवणारी कहाणी

गुजरातच्या अहमदाबादमधील एका महिलेने पोलिसांना सांगितलेला अनुभव धक्कादायक आहे. तिचा आरोप आहे की, तिचा पती तिला पॉर्न पाहण्यास भाग पाडतो आणि त्यानंतर तिच्यावर अनैसर्गिक कृत्य करतो. तिने विरोध केल्यास तो तिला मारहाण करतो.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 08:33 AM • 29 Jun 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

नवरा मला पॉर्न बघायला लावतो

point

मग अनैसर्गिक कृत्य करतो

point

महिलेनं सांगितली हादरवणारी कहाणी

Crime News : गुजरातमधील अहमदाबाद येथील शाहीबाग परिसरातून एक अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. येथे एका विवाहित महिलेने आपल्या पतीवर आणि सासरच्या मंडळींवर शारीरिक आणि मानसिक छळाचे अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. पतीने जबरदस्तीने पॉर्न फिल्म्स दाखवून अनैसर्गिक कृत्य करणे, मारहाण करणे आणि गर्भपातासाठी दबाव टाकणे यांसारखे धक्कादायक प्रकार केल्याचे पीडितेने म्हटले आहे. याप्रकरणी महिलेने अहमदाबाद महिला पोलीस ठाण्यात पती, सासू आणि दीर यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

हे वाचलं का?

मुलीच्या जन्मानंतर क्रूर वागणूक

पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, या महिलेचा विवाह 2011 मध्ये झाला होता. मात्र, लग्नाच्या केवळ पंधरा दिवसांनंतरच सासरच्यांनी तिचा हुंड्यावरून छळ करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, पतीचे हे दुसरे लग्न असून त्याला आधीच एक मूल असल्याची माहिती सासरच्यांनी लग्नापूर्वी लपवून ठेवली होती. महिला पहिल्यांदा गर्भवती असतानाही तिला पुरेशी विश्रांती न देता तिच्याकडून घरातील सर्व जड कामे करून घेतली जात होती. सासू आणि दीर सतत टोमणे मारत असत, तर मुलीच्या जन्मानंतरही पतीच्या क्रूर वागणुकीत कोणताही बदल झाला नाही.

हे ही वाचा : भयंकर! महाराष्ट्रातील 25 तरुणांना ओलीस ठेवलं, म्यानमार-थायलंड सीमेवर काय घडलं?

जबरदस्तीने शारीरिक संबंध

पतीचे वागणे अत्यंत विकृत होते. तो रात्री उशिरा घरी येऊन पत्नीच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करत असे. पत्नी आजारी असतानाही तिला उत्तेजक औषधे देऊन संबंधांसाठी भाग पाडले जायचे आणि नकार दिल्यास बेदम मारहाण केली जायची. पत्नी दुसऱ्यांदा गर्भवती असताना पतीने तिला लाथा मारून गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला. याशिवाय, पती रात्रीच्या वेळी परदेशी महिलांसोबत व्हिडिओ कॉलवर अश्लील गप्पा मारायचा आणि ते व्हिडिओ पत्नीला दाखवून तशाच प्रकारच्या संबंधांसाठी तिच्यावर जबरदस्ती करायचा.

हे ही वाचा : फडणवीसांबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा, परभणीच्या सभेत काय म्हणाले?

पतीचं अफेअर

या सर्व त्रासाला कंटाळून पत्नी काही काळ माहेरी गेली होती, पण पतीने तिला पुन्हा बळजबरीने सासरी आणले. सासू आणि दीर 'तू आमच्या मुलाला पसंत नाहीस, घटस्फोट घेऊन वेगळी हो' असे सांगून मानसिक छळ करत होते. तिसऱ्या मुलीच्या जन्मानंतर जेव्हा पत्नीने पतीच्या बाहेरील अफेअरबद्दल सासूला सांगितले, तेव्हा सासूने भांडण करून तिला घराबाहेर काढले. त्यानंतर पतीने पत्नी आणि तीन मुलींना एका वेगळ्या घरात पाठवून दिले व पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर असह्य झाल्याने पीडितेने महिला पोलिसांत धाव घेतली असून, या प्रकरणी आता पोलिसांकडून सखोल कायदेशीर कारवाई सुरू आहे.