मुंबई : नजर काढण्याच्या बहाण्याने घरात शिरला, बहुरुपी तृतीयपंथीयाचा महिलेवर लैंगिक अत्याचार

मुंबई तक

21 Aug 2026 (अपडेटेड: 21 Aug 2026, 10:56 AM)

Mumbai Crime News : पवईत नजर काढण्याच्या बहाण्याने घरात शिरलेल्या तृतीयपंथीयाने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पवई पोलिसांनी गुन्हा दाखल करून अवघ्या चार तासांत आरोपीला अटक केली.

Mumbai Crime News

Mumbai Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबई : नजर काढण्याच्या बहाण्याने घरात शिरला

point

बहुरुपी तृतीयपंथीयाचा महिलेवर लैंगिक अत्याचार

Mumbai Crime News : मुंबईतील पवई परिसरात नजर काढण्याच्या बहाण्याने घरात शिरलेल्या एका बहुरूपी तृतीयपंथीयाने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पवई पोलिसांनी गुन्हा दाखल करून अवघ्या चार तासांत आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास तक्रारदार महिला त्यांच्या घरी एकट्या होत्या. त्याचवेळी अनिल नावाचा तृतीयपंथी त्यांच्या घरात शिरला.

हे वाचलं का?

हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात पावसाचा ब्रेक कायम, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

बरे-वाईट करण्याची भीती दाखवत केला अत्याचार 

महिला घरात एकट्या असल्याचा फायदा घेत आरोपीने त्यांना भीती घातली. त्यांचे बरे-वाईट करण्याची भीती दाखवत आरोपीने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर महिलेने पवई पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. 

हेही वाचा : नऊ वर्षांच्या मुलीवर भावासमोर लैंगिक अत्याचार, अखेर कुटुंबीयांना सांगितला घटनेचा थरार

अवघ्या चार तासांत आरोपीला अटक

तपासादरम्यान पोलिसांना आरोपीबाबत महत्त्वाची माहिती मिळाली. साडी परिधान केलेला तृतीयपंथी एका रिक्षातून गेल्याचे तपासात दिसून आले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपास पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तपासामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या चार तासांत आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणातील पुढील तपास पवई पोलिसांकडून सुरू आहे.

18 ऑगस्ट रोजी दुपारी घडलेल्या या घटनेत घरात महिला एकट्या असल्याची संधी साधून आरोपीने घरात प्रवेश केल्याचे तक्रारीत नमूद आहे. नजर काढण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश केल्यानंतर आरोपीने महिलेवर बरे-वाईट करण्याची भीती दाखवली आणि त्यानंतर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पवई पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला.