जावयाने सासूवर लैंगिक अत्याचार करत घरातच संपवलं, लाज आणणारा प्रकार

Crime News : जावयानेच आपल्याच सासूवर लैंगिक अत्याचार केला आणि नंतर तिचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मुलीने आपल्याच नवऱ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत प्रकरणाचा तपास सुरु केला. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

12 Feb 2026 (अपडेटेड: 12 Feb 2026, 10:22 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सासूवर घरातच लैंगिक अत्याचार...

point

मृत्यूचे नेमकं कारण काय? 

Crime News : जावयानेच आपल्याच सासूवर लैंगिक अत्याचार केले आणि नंतर तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मुलीने आपल्याच नवऱ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत प्रकरणाचा तपास सुरु केला. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने दारूच्या नशेतच असे कृत्य केलं असावं अशी माहिती समोर आली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बारावीच्या पहिल्याच पेपरला जाताना विद्यार्थ्यावर काळाचा घाला; रेल्वेतून पडून दुर्दैवी अंत

सासूवर घरातच लैंगिक अत्याचार...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 8 फेब्रुवारी रोजी रात्री कुलावर्ती मंडल येथे घडली. हा प्रकार घडला तेव्हा वृद्ध महिला घरात एकटीच होती. आरोपीची पत्नी आणि पीडित मुलीने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं की, सुमारे 40 वर्षांचा आरोपी हा कामगार आणि मद्यपी आहे. तक्रारीनुसार त्याने त्याच्या सासूवर घरातच लैंगिक अत्याचार केला आणि नंतर तिला संपवलं. 

हे ही वाचा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मंत्रिमंडळातील पहिलीच बैठक, अजितदादांच्या 'त्या' तीन मागण्यांना मंजुरी

मृत्यूचे नेमकं कारण काय? तपास सुरु

संबंधित प्रकरणात पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, आरोपीने वृद्ध महिलेवर हल्ला केला असावा, ज्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मृत्यूचे नेमकं कारण काय याचा तपास सुरु आहे. नंतर पोलिसांनी असं देखील सांगितलं की, आरोपीने दारूच्या नशेत असताना हा गुन्हा केल्याची शक्यता आहे. तक्रारीच्या आधारे, कुलवाकुर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपीला ताब्यात घेण्यात आले. 

    follow whatsapp