Crime News : सिरसा जिल्ह्यातील सिकंदरपूर थेडी गावात अवैध संबंधाच्या वादातून घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे. अवघ्या काही तासांत आई आणि तिच्या कथित प्रियकराचा जीव घेऊन आरोपी मुलाने स्वतः पोलिस ठाण्यात येऊन सरेंडर केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही धक्कादायक घटना गुरुवारी उशिरा रात्री घडली.
ADVERTISEMENT
अधिकची माहिती अशी की, आरोपी युवकाने आपल्या आई अंगुरी देवी (वय सुमारे 50) आणि तिच्या कथित प्रेमी लेखचंद (वय 50) यांचा गळा आवळून खून केला. रात्री दोनच्या सुमारास दोघांना ठार केल्यानंतर आरोपीने शुक्रवारी सकाळी दोन्ही मृतदेह पिकअप वाहनात ठेवले आणि थेट सिरसा सदर पोलिस ठाण्यात पोहोचला. तेथे पोलिसांसमोर हजर होत त्याने संपूर्ण घटना सांगितली.
हेही वाचा : नाशिक : भावपूर्ण श्रद्धांजलीचं स्टेटस, पत्नीसह दोन मुलांचा खून केला अन् स्वत:ही गळफास घेऊन केली आत्महत्या
पोलिसांनी तत्काळ दोन्ही मृतदेह जप्त करून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. प्राथमिक चौकशीत आरोपीने आई आणि लेखचंद यांच्यातील अवैध संबंधांमुळेच हा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगितले. तसेच या हत्याकांडात त्याच्या पत्नीचाही सहभाग असल्याची माहिती पोलिसांना दिली.
डीएसपी राजेश कुमार यांनी सांगितले की, “एक युवक पिकअप गाडीत दोन मृतदेह घेऊन थेट सदर ठाण्यात आला. त्याने आई आणि शेजारील व्यक्ती लेखचंद यांचा खून केल्याची कबुली दिली. त्याने हत्येचे कारणही स्पष्टपणे सांगितले.”
पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी मुलाने अनेकदा आपल्या आईला त्या संबंधांबद्दल समजावण्याचा प्रयत्न केला होता. तरीही परिस्थिती न बदलल्याने त्याने गुरुवारी रात्री अंगुरी देवी आणि लेखचंद यांची स्टोलने गळा आवळून हत्या केली. या दुहेरी हत्याकांडाने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. दोन्ही मृतदेहांचे पोस्टमॉर्टेम सुरू असून तपासातून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











