कॉलेजला सोडण्याच्या बहाण्याने विद्यार्थीनीला नेलं घरी, नंतर केलं लैंगिक शोषण, जर कोणाला सांगितलं तर....दिली धमकी

crime news : इयत्ता बारावीचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थीनीचं एका तरुणाने लैंगिक शोषण केलं. त्यानंतर तिच्यासोबत जे घडलं आहे ते कोणाला सांगितल्यास जीवं मारेन अशी धमकीही दिली.

crime news

crime news

मुंबई तक

• 02:42 PM • 23 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

तरुणाकडून विद्यार्थीनीचं लैंगिक शोषण

point

कारण ऐकून तुम्हीही चक्रावून जाल

Crime News : हरियाणातील सेनापतमध्ये इयत्ता बारावीचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थीनीचं एका तरुणाने लैंगिक शोषण केलं. दोघांचीही इंस्टाग्रामवर फ्रेंडशीप झाली होती. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर हे नात्यात झालं आणि दोघांमधील अधिकच संवाद वाढू लागला. त्यातूनच तरुणाने मैत्रीचा, नात्याचा गैरफायदा घेऊन तिचं लैंगिक शोषण केलं आहे. आरोपी तरुणाचं नाव हर्ष असल्याची माहिती समोर आली आहे.  

हे वाचलं का?

हेही वाचा : काकानेच पुतण्यांवर चाकूने केले सपासप वार, एक गंभीर जखमी तर एकाचा जागीच मृत्यू, हादरून टाकणारी घटना

घटनेचा घटनाक्रम

सोमवारी, जेव्हा विद्यार्थीनी विद्यालयात जात होती, तेव्हाच प्रियकर हर्ष तिला तिच्या कॉलनीजवळ विद्यालयात सोडण्याच्या बहाण्याने आला. पण तिला विद्यालयात नेण्याऐवजी थेट त्याने आपल्या घरीच तिला नेलं. घरी कोणीही नसल्याची संधी साधून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. 

हा सर्व प्रकार घडल्यानंतर तिने पीडितेला कोणालाही न सांगण्याची धमकी दिली. जर तु कोणाला काही सांगितल्यास, मारून टाकेन अशी धमकी देण्यात आली. या धमकीमुळे पीडित तरुणी ही अधिकच भयभीत झाली होती. ती घरी गेला असता, तिने घडलेला सर्व प्रकार हा आपल्या आई वडिलांना सांगितला.

त्यानंतर कुटुंबियांनी तातडीने पोलीस ठाणे गाठलं आणि नराधम्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी हर्षला अटक केली आहे. शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अरुण कुमार यांनी संबंधित प्रकरणात पुढील कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. 

हेही वाचा : भयंकर! नातेवाईकांनीच विधवा महिलेची 'एवढ्या' लाखांना केली विक्री, मुलंही होती बेपत्ता

हरियाणात शालेय विद्यार्थीनीवर बलात्कार 

दरम्यान, हरियाणातील रेवाडीत इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थीनीवर तिच्याच शेजाऱ्याने लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला. तिला उलट्या झाल्यानंतर तिच्या आईला संशय आला आणि तिने गर्भधारणेची चाचणी केली असता, तेव्हा ती प्रेग्नंट असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पीडित विद्यार्थीनीने तिच्या आईला घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती दिली. पोलिसांनी आरोपी शेजाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या त्यांचा शोध सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.  

    follow whatsapp